नांदेड मनपा निवडणूक: मतदानाला सुरुवात, पण सकाळी ‘उत्साह बेपत्ता’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:33 IST2026-01-15T11:33:03+5:302026-01-15T11:33:47+5:30
सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ७.१६ टक्के मतदान झाले

नांदेड मनपा निवडणूक: मतदानाला सुरुवात, पण सकाळी ‘उत्साह बेपत्ता’
नांदेड : नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सकाळच्या सत्रात मतदारांचा अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली असून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ७.१६ टक्के मतदान झाले आहे. एकूण ३५ हजार ९५१ मतदारांनी हक्क बजावला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तब्बल ४९१ उमेदवार रिंगणात असतानाही अनेक मतदान केंद्रांवर पहाटेच्या वेळेत शुकशुकाटाचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाकडून मतदार जागृतीचे प्रयत्न करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसली नाही.
सकाळच्या सत्रात मतदानाचा उत्साह कमी राहिल्याने एकूण मतदानाच्या टक्केवारीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुपारनंतर व सायंकाळी मतदार प्रतिसाद वाढतो का, याकडे आता राजकीय पक्षांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.