नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

By योगेश पांडे | Published: April 19, 2024 11:44 AM2024-04-19T11:44:49+5:302024-04-19T11:45:21+5:30

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

VVIP voting in Nagpur tight security at polling stations lok sabha election 2024 | नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सकाळी साडेदहा वाजताच्या आतच शहरातील अनेक व्हीव्हीआयपी व मान्यवरांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. नागरिकांनी मतदान केंद्रांवर जात मतदान करण्याचे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले.
 

सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केले. महाल येथील भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. मतदान हे सर्वांचेच कर्तव्य व अधिकार आहे. शतप्रतिशत मतदानासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडून हे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले.
 

 

महाल येथील टाऊन हॉलमध्ये केंद्रीय मंत्री व भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन, निखील-सारंग ही मुले, सुना उपस्थित होते. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था तैनात होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ हिंदी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जात मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांच्या आई सरिता व पत्नी अमृता यांनीदेखील मतदानाचे कर्तव्य बजावले. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
 

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री येणार म्हणून त्या कालावधीत केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी आले होते. कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील कुटुंबियांसह कोराडी येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
 

पंजाबच्या राज्यपालांचे नागपुरात मतदान
 

पंजाबचे ज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मतदान केले.

Web Title: VVIP voting in Nagpur tight security at polling stations lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.