सिर्सी ग्रा.प. सरपंच विलास माकोडे अखेर पायउतार; बोगस मासिक सभा, चुकीचा जमा-खर्च भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 14:55 IST2022-10-12T14:46:32+5:302022-10-12T14:55:48+5:30
भोजराज पुंडलिक दांदडे यांच्या तक्रार अर्जानंतर सरपंच विलास माकोडे यांना पायउतार व्हावे लागले.

सिर्सी ग्रा.प. सरपंच विलास माकोडे अखेर पायउतार; बोगस मासिक सभा, चुकीचा जमा-खर्च भोवला
उमरेड (नागपूर) : उमरेड तालुक्यातील सिर्सी ग्रामपंचायतीचे सरपंच विलास विठ्ठल माकोडे यांना अपात्र घोषित करण्यात आले. विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितेश माने यांच्या स्वाक्षरीसह माकोडे यांच्या अपात्रतेचे पत्र धडकले.
भोजराज पुंडलिक दांदडे यांच्या तक्रार अर्जानंतर सरपंच विलास माकोडे यांना पायउतार व्हावे लागले. बोगस मासिक सभा दाखवून गैरहजर असतानाही उपस्थिती बुकावर स्वाक्षरी करणे, नियमबाह्य मासिक सभेच्या नोटीस, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये चुकीचा जमा-खर्च दाखविणे आणि आठवडी बाजाराची अवैध वसुली प्रकरण आदी गैरप्रकारांवर ठपका ठेवण्यात आला. पदाचा दुरूपयोग केला असल्याने विलास माकोडे यांच्याविरूद्ध कलम ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई केल्या गेली. अर्जदार भोजराज दांदडे यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज मान्य करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.