नागपुरात सागर डबरासेंची झंझावती प्रचार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:27 IST2019-04-09T23:24:47+5:302019-04-09T23:27:17+5:30

वंचित बहुजन आघाडीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार सागर डबरासे यांनी उत्तर नागपुरातील भीम चौकातून आपल्या झंझावती प्रचार रॅलीला सुरुवात केली. निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्यामुळे रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शहर पिंजून काढला. ४० ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहनांवर स्वार होऊन कार्यकर्त्यांनी मतदारांना सागर डबरासेंना प्रचंड बहुमताने निवडुन आणण्याचे आवाहन केले.

In Nagpur Sagar Dabrase's Jhanjhawati Rally | नागपुरात सागर डबरासेंची झंझावती प्रचार रॅली

नागपुरात सागर डबरासेंची झंझावती प्रचार रॅली

ठळक मुद्दे‘बहुजनांनो जागे व्हा’चा नारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार सागर डबरासे यांनी उत्तर नागपुरातील भीम चौकातून आपल्या झंझावती प्रचार रॅलीला सुरुवात केली. निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्यामुळे रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शहर पिंजून काढला. ४० ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहनांवर स्वार होऊन कार्यकर्त्यांनी मतदारांना सागर डबरासेंना प्रचंड बहुमताने निवडुन आणण्याचे आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीचे नागपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सागर डबरासे यांनी जरीपटकाच्या भीम चौकातून आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली. रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांनी हातात निळे झेंडे, हिरवे झेंडे घेऊन बहुजनांना जागे व्हा, महिलाओं, गरिबों के सन्मान मे, वंचित बहुजन आघाडी मैदान मे नारे दिले. रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भीम चौकातून रॅली नारा, नारी, सहयोगनगर, सुगतनगर, कपिलनगर, पिवळी नदी, यशोधरानगर, नागसेनवन, कळमना, कावळापेठ, वैशालीनगर, पंचशीलनगर, महेंद्रनगर, यादवनगर, कमाल चौक, बुद्धनगर, सिद्धार्थनगर, आवळे बाबू चौक, इंदोरा, मिसाळ लेआऊट या मार्गाने काढण्यात आली. बेझनबाग येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी सागर डबरासे यांच्या कपबशी या निवडणुक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी रवी शेंडे, मिलिंद मेश्राम, हरीश नारनवरे, रंजना डबरासे, गोवर्धन भेले, अरुण फुलझेले, वनमाला उके, शरद दंडाळे, नरेंद्र तिरपुडे, रवी वंजारी, धम्मपाल वंजारी, हरीश नारनवरे, आनंद चौरे, आनंद मेश्राम, संजय पाटील, दिशा भिवगडे, भाऊराव सोनपिपळे, कांचन देवगडे, भूषण भस्मे, विशाल वानखेडे, आनंद बागडे, रमा वंजारी, दामोदर रामटेके, देवेंद्र डोंगरे, राजेश भंडारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: In Nagpur Sagar Dabrase's Jhanjhawati Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.