Maharashtra Nagar Palika Election Result: काटोलचा निकाल स्पष्ट ! नगराध्यक्षपदी अर्चना देशमुख विजयी; भाजपला किती मिळाल्या जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:43 IST2025-12-21T13:42:46+5:302025-12-21T13:43:53+5:30
Nagpur : खूप प्रतीक्षेनंतर होणाऱ्या नगरपरिषदेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल अखेर रविवारी म्हणजेच आज लागत आहे.

Maharashtra Nagar Palika Election Result: Katol result clear! Archana Deshmukh wins as Mayor; How many seats did BJP get?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खूप प्रतीक्षेनंतर होणाऱ्या नगरपरिषदेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल अखेर रविवारी म्हणजेच आज लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींत कोण मैदान मारणार हे हळू हळू स्पष्ट होत आहे. काटोल नगर पालिकेच्या सर्व १२ प्रभागांचा निकाल स्पष्ट झाला असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व शेकापच्या उमेदवार अर्चना देशमुख २३७६ मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व शेकापला १२ जागा तर भाजपच्या १३ जागा निवडून आल्या आहेत.
दरम्यान, शनिवारी कामठी, नरखेड, रामटेक नगरपरिषद आणि कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील ९ प्रभागांसाठी शांततेत मतदान पार पाडले. न्यायालयीन अपिलानंतर येथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील २७ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दि. २ डिसेंबरला ६१.२५ टक्के मतदान झाले होते. यात एकूण ७ लाख २९ हजार ८२२ मतदारांपैकी ४ लाख ४७ हजार ११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २ लाख २८ हजार १८६ पुरुष, २ लाख १८ हजार ८२३ महिला व २ इतर मतदारांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या मतदानानंतर सरासरी मतदानांचा टक्का वाढला आहे. नगराध्यक्षपदांच्या २७ जागांसाठी १६७ उमेदवार रिंगणात होते.