Maharashtra Assembly Election 2019 : देशहितासाठी काँग्रेसला मतदान करा : नदीम जावेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:01 IST2019-10-18T00:58:12+5:302019-10-18T01:01:28+5:30
देशहितासाठी काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद यांनी केले.

Maharashtra Assembly Election 2019 : देशहितासाठी काँग्रेसला मतदान करा : नदीम जावेद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीकडे नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. आधी निवडणूक सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन व्हायची. परंतु आता ही निवडणूक शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षा, युवक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून धर्म, समाज, जातपात आणि काहीही झाले तरी पाकिस्तानला धडा शिकवायचा, या मुद्यावर होत आहेत. परंतु नागरिकांनी देशहितासाठी काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद यांनी केले.
उत्तर नागपुरातील नवी वस्ती टेका येथे उत्तर नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. नदीम जावेद यांनी उपस्थित नागरिकांना काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, कृष्णकुमार पांडे, संजय दुबे, कुणाल राऊत, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, जुल्फेकार अहमद भुट्टो, शकुर नागानी, ओवेस कादरी आदी उपस्थित होते. यावेळी इंडियन मुस्लीम लीगच्या नेत्यांनी डॉ. नितीन राऊत यांच्या विजयाचे अवाहन केले. मुस्लीम लीगचे माजी नगरसेवक असलम मुल्ला, युवक अध्यक्ष जुबेर खान, हाजी आसीफ अन्सारी, मोहम्मद इकबाल, जमील सेठ, अयुब अख्तर, गुफरान भाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ महासचिव सलीम खान यांनी केले. आभार जुबेर खान यांनी मानले.