निवडणूक खर्चाचे ऑडिट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:43 IST2019-06-27T23:41:39+5:302019-06-27T23:43:45+5:30
लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेले खर्चाचे ऑडिट होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती आहे. यामुळे अवाजवी खर्च करणारे विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.

निवडणूक खर्चाचे ऑडिट होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेले खर्चाचे ऑडिट होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती आहे. यामुळे अवाजवी खर्च करणारे विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. नागपूर-रामटेक लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत लाखोंचा खर्च झाला. खर्च करताना काही कामासाठी निविदा काढण्यात आल्या. तर काही काम विनानिविदा देण्यात आल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका खुद्द मुख्य निवडणूक आयोगालाच आहे. त्यामुळे याचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही आयोगाच्या सूचनेवरून खर्चाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी अवास्तव खर्च करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या वर्षीही ऑडिट करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. यामुळे प्रशासनात खळबळ उडली आहे. मतदानाला दोन आणि मतमोजणीला एक महिन्याचा कालावधी झाल्यावरही अनेक विभागांनी बिलच सादर केलेली नाही. काही विभागांनी खर्च योग्यरीत्या केला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच बिल सादर करण्यास विलंब होत आहे. खर्चाची जुळवाजुळव या बिलांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळेच बिल सादर करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.
बिल सादर न करता अधिकारी सुटीवर
काही अधिकारी सुटीवर गेल्याची माहिती आहे. त्यांनी निवडणुकीत झालेल्या खर्चाचे बिल अद्याप सादर कलेले नाही. निवडणूक संपूण महिना लोटला तरी बिल सादर झालेले नाही.