Crime News : नागपूरमधील ५० गुंडांना हाकलले शहराबाहेर; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सुरक्षेचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:14 IST2025-08-28T18:12:54+5:302025-08-28T18:14:41+5:30

गणेशोत्सवानिमित्त केले तडीपार : झोन २ मधील ६ ठाण्यांतर्गत कारवाई

Crime News : 50 goons in Nagpur driven out of the city; Police security plan active for Ganeshotsav | Crime News : नागपूरमधील ५० गुंडांना हाकलले शहराबाहेर; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सुरक्षेचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह

50 goons in Nagpur driven out of the city; Police security plan active for Ganeshotsav

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गणेशोत्सव आणि आगामी सणांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये या दृष्टीने शहर पोलिसांनी परिमंडळ २ मधील सहा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ५० कुख्यात गुन्हेगारांना तडीपार केले आहे. गणेशोत्सव होईपर्यंत १३ दिवस त्यांना नागपूर शहर व ग्रामीणच्या हद्दीतून तडीपार करून आहे. नातेवाईकांकडे सोडण्यात आले


शहर पोलिसांनी परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या धंतोली, सीताबर्डी, अंबाझरी, सदर, गिट्टीखदान व मानकापूर अशा एकूण ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले, वारंवार कायदेशीर कारवाई करूनही प्रवृत्तीत सुधारणा न झालेले, अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण ५० गुन्हेगारांविरुद्ध परिमंडळ २ च्या उपायुक्तांकडे हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.


परिमंडळ २ च्या उपायुक्तांनी त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या कलम १६३ (२) नुसार असलेल्या अधिकाराचा वापर केला. त्यानुसार ७ ऑगस्ट २०२५ रोजी धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत ७, सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत ६, अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ११, सदर पोलिस ठाण्यांतर्गत १७, गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत ४ व मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ५ अशा एकूण ५० गुन्हेगारांना नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून १३ दिवसांसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला. या गुन्हेगारांना बुधवारी २७ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.


 

Web Title: Crime News : 50 goons in Nagpur driven out of the city; Police security plan active for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.