बेलतरोडी झाले चोरट्यांचा अड्डा, आणखी एक घरफोडी

By दयानंद पाईकराव | Updated: April 22, 2023 15:51 IST2023-04-22T15:48:16+5:302023-04-22T15:51:51+5:30

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

another burglary in beltarodi of nagpur, 2.45 lakh worth of goods stolen | बेलतरोडी झाले चोरट्यांचा अड्डा, आणखी एक घरफोडी

बेलतरोडी झाले चोरट्यांचा अड्डा, आणखी एक घरफोडी

नागपूर : बेलतरोडी चोरटटांचा अड्डा झाले असून दिवसाढवळ्या एका वकीलाच्या घरी लुटमार करण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी एका घरातून २.४५ लाखांचा मुद्देमाल पळविला आहे. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे.

बेलतरोडीत मागील आठवड्यात चाकुच्या धाकावर एका वकीलाच्या पत्नीला लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर १९ एप्रिल २०२३ रोजी रुद्धशील चंदन मेश्राम (वय ५७, रा. प्लॉट नं. २५९, बोधीछायानगर विकास सोसायटी नरेंद्रनगर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. अज्ञात आरोपीने संधी साधून त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडले. आरोपीने घरातील सोन्याचे दागिने, व्हिडीओ कॅमेरा, साधा कॅमेरा व रोख १.४५ लाख असा एकुण २.४५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असामाजिक तत्वांचा उपद्रव वाढला असून बेलतरोडी पोलिस त्यावर अंकुश मिळविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.

Web Title: another burglary in beltarodi of nagpur, 2.45 lakh worth of goods stolen