८० उमेदवारांचे अर्ज बाद, १२९४ मैदानात ! आज माघारीनंतर लढतीचे चित्र होणार स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:41 IST2026-01-02T15:36:50+5:302026-01-02T15:41:22+5:30
Nagpur : महापालिका निवडणुकीसाठी ३८ प्रभागांतून दाखल झालेल्या १३७४ उमेदवारी अर्जाची बुधवारी सर्व १० निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननीची प्रक्रिया पार पडली.

80 candidates' applications rejected, 1294 in the fray! The picture of the contest will be clear after today's withdrawal
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी ३८ प्रभागांतून दाखल झालेल्या १३७४ उमेदवारी अर्जाची बुधवारी सर्व १० निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननीची प्रक्रिया पार पडली. यात विविध कारणाने ८० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे रिंगणात १२९४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. परंतु अर्ज माघारीनंतर नेमके किती जण निवडणूक लढवणार, हे स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीत यंदा उमेदवारांचा चांगलाच उत्साह दिसत आहे. प्रत्येकाने आपापले अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याची चांगल्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. काहींनी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच तपासणी करून घेतल्याने राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेत वैध ठरले आहेत. शुक्रवारी (२ जानेवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेनंतरच खरे उमेदवार किती, याचा अंदाज येणार आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या छाननीमध्ये महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील सर्वाधिक १८ उमेदवारांची अर्ज बाद ठरले आहेत. तर सर्वात कमी गांधीबाग झोनमधील फक्त एक अर्ज बाद ठरला आहे.
आशीनगरात १८० उमेदवारी अर्ज सर्वाधिक
१५१ जागांसाठी १३७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक १८८ उमेदवारी अर्ज आशीनगर झोनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. यातील ८ अर्ज बाद ठरल्यानंतरही १८० अर्ज वैध ठरले आहेत. सर्वात कमी ७८ उमेदवारी अर्ज लक्ष्मीनगर झोनधून दाखल करण्यात आले असून, ३ अर्ज बाद ठरले तर प्रभागात ७५ अर्ज वैध ठरले आहेत.
झोन अवैध अर्ज वैध अर्ज
- लक्ष्मीनगर ३ ७५
- धरमपेठ १६ १०७
- हनुमाननगर १४ ११३
- धंतोली ७ १२२
- नेहरूनगर ५ १४४
- गांधीबाग १ १३९
- सतरंजीपुरा ४ १२४
- लकडगंज ४ १३७
- आशीनगर ८ १८०
- मंगळवारी १८ १५३
- एकूण ८० १२९४