लसीकरणाला दुसऱ्या दिवशीच खीळ; नावे नोंदविण्यासह संदेश पोहचण्यास अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:17+5:302021-01-18T04:07:17+5:30

लोकमत न्यून नेटवर्क मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईसह राज्यात शनिवारपासून लसीकरण मोहीम वेगाने हाती घेण्यात आली असली ...

Vaccination is delayed until the next day; Barriers to message delivery, including registration | लसीकरणाला दुसऱ्या दिवशीच खीळ; नावे नोंदविण्यासह संदेश पोहचण्यास अडथळे

लसीकरणाला दुसऱ्या दिवशीच खीळ; नावे नोंदविण्यासह संदेश पोहचण्यास अडथळे

googlenewsNext

लोकमत न्यून नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईसह राज्यात शनिवारपासून लसीकरण मोहीम वेगाने हाती घेण्यात आली असली तरीदेखील दुसऱ्याच दिवशी या लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. कारण लसीकरणासाठीच्या कोविन-अ‍ॅपवर नाव-नोंदणी करण्यास अडथळा येणे. नाव-नोंदणी करतेवेळी किंवा नोंदणी झाल्यानंतर संदेश न जाणे अशा तांत्रिक समस्या येत आहेत. त्यामुळे रविवारसह सोमवारी असे दोन दिवस लसीकरण स्थगिती करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले.

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि, यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र आता कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले असून, ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने १७ सह १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता आहे. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणूक क्षमता असून, लसीकरणासाठी ५०० पथक व दिवसाला ५० हजार जणांना लसीकरणाचे नियोजन आहे. महापालिकेच्या वतीने नऊ लसीकरण केंद्रांवर मिळून ४० लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस महापालिकेला उपलब्ध झाले.

Web Title: Vaccination is delayed until the next day; Barriers to message delivery, including registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.