इंजिनिअर पतीचे इतर पुरुषांशी संबंध; पत्नीने घरात कॅमेरा लावून रंगेहाथ पकडलं; मुंबईत समोर आलं धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:56 IST2026-05-02T15:56:13+5:302026-05-02T15:56:44+5:30
करोडो रुपये खर्चून थाटात केलं लग्न, पण पती निघाला भलताच; छुपा कॅमेरा लावला अन् पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली

इंजिनिअर पतीचे इतर पुरुषांशी संबंध; पत्नीने घरात कॅमेरा लावून रंगेहाथ पकडलं; मुंबईत समोर आलं धक्कादायक वास्तव
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित पतीने पत्नीचा हुंड्यासाठी छळ तर केला. पण त्याच्या एका कृत्याचा उलगडा झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या या पतीचे इतर पुरुषांशी अनैसर्गिक संबंध असल्याचे पत्नीने पुराव्यासह उघड केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरी येथील रूपाली गुप्ता हिचे लग्न १९ फेब्रुवारी २०२४ रोजी एटा जिल्ह्यातील शिवम गुप्ता याच्याशी झाले होते. रूपालीच्या कुटुंबीयांनी या लग्नात रोख रक्कम, दागिने आणि इतर वस्तू असा एकूण १ कोटी रुपयांचा खर्च केला होता. इतका खर्च करूनही शिवमचे समाधान झाले नाही आणि त्याने आणखी ५० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी रूपालीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
छुप्या कॅमेऱ्याने उघड केलं पतीचं सत्य
शिवम हा एम.टेक पदवीधारक असून तो मुंबईत दरमहा २.५ लाख रुपये कमवतो. लग्नानंतर तो पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होता, ज्यामुळे रूपालीला संशय आला. आपल्या पतीच्या वागण्यामागील बदलाचे कारण शोधण्यासाठी रूपालीने त्यांच्या भाड्याच्या खोलीत छुपा कॅमेरा बसवला. २१ जून २०२५ रोजी या कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तिने जे पाहिले, त्यामुळे तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. तिचा पती घरात इतर पुरुषांना बोलावून त्यांच्याशी अनैसर्गिक आणि आक्षेपार्ह कृत्य करत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले.
जीवे मारण्याची धमकी आणि पोलिसात धाव
जेव्हा रूपालीने या प्रकाराबाबत पतीला जाब विचारला आणि कुटुंबियांना सांगण्याची धमकी दिली, तेव्हा शिवमने तिला ठार मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला भीतीपोटी तिने तक्रार केली नाही, मात्र नंतर तिने पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर २९ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी शिवम गुप्ता विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता त्या व्हिडिओ फुटेजची आणि इतर पुराव्यांची तपासणी करत असून पुढील सुरु करण्यात आला आहे.