आजपासून इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया; १८ जूनपर्यंत भरता येणार अर्ज

By Admin | Updated: June 5, 2015 01:34 IST2015-06-05T01:34:09+5:302015-06-05T01:34:09+5:30

जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केले आहे.

Starting from today the engineering process; Application to fill up till 18th June | आजपासून इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया; १८ जूनपर्यंत भरता येणार अर्ज

आजपासून इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया; १८ जूनपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबई : जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केले आहे. ५ जूनपासून इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया
सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना
१८ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.
इंजिनीअरिंग महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना डीटीईच्या संकेतस्थळावर ५ ते १८ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट २१ जून रोजी जाहीर होणार आहे. तर अंतिम मेरिट लिस्ट २६ जून रोजी जाहीर होईल. यानंतर कौन्सिलिंग राऊंड
१६ जुलै रोजी पार पडणार आहे.
यंदा इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या १ लाख ५५ हजार ८६७ जागा उपलब्ध आहेत. ५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती पुस्तिका अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) उपलब्ध होणार असून, शुक्रवारपासून आॅनलाइन अर्ज भरण्यासही सुरुवात होईल. तसेच एआरसी केंद्रांवर कागदपत्रांची तपासणी ६ ते २० जूनपर्यंत होईल. त्यानंतर हरकती व तक्रारींचा विचार करून अंतिम गुणवत्ता यादी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल. प्रवेशाचे वेळापत्रक डीटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Starting from today the engineering process; Application to fill up till 18th June