ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 06:00 IST2024-11-11T06:00:22+5:302024-11-11T06:00:52+5:30

ज्यांनी आपल्याला लुटले त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ आणि जेलमध्ये पाठवू, असा इशारा उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथे दिला. 

Punish those who robbed us says shiv sena aditya thackeray | ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आमच्याशी ४० जणांनी गद्दारी केली, तेव्हा त्यांच्यासोबत येथील आमदारदेखील होत्या. त्या आता म्हणतात की, मला निवडून द्या. मी मंत्री होणार आहे. पण  त्या आमदारही होणार नाहीत.  त्यांचे सरकार पुन्हा येणारच नाही. उलट ज्यांनी ज्यांनी आपल्याला लुटले त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ आणि जेलमध्ये पाठवू, असा इशारा उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथे दिला. 

आदित्य म्हणाले की, येथे तरुणांना रोजगार नाही. योगी येतात आणि म्हणतात, बटोंगे तो कटोंगे, पण मी तुम्हाला सांगतोय भाजप आपले खिसे कापायला तयार आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि हृदयात राम आहे. त्यामुळे आमचे सरकार येणार आहे. तेव्हा एकच ध्येय ते म्हणजे तरुणांना रोजगार देणे. ही   विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजप सत्तेत आले तर आपला खिसा कापायचे काम करणार. येथील प्रकल्प गुजरातला घेऊन गेलेत, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Punish those who robbed us says shiv sena aditya thackeray