महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:15 IST2026-04-23T10:15:39+5:302026-04-23T10:15:55+5:30

मुंबईत एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

National Level Woman Cricketer Arrested in Mumbai for 63 Lakh Sextortion Case | महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले

महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले

Mumbai Crime: राष्ट्रीय स्तरावरील एका महिला क्रिकेटपटूने आपल्या भावाच्या मदतीने हनीट्रॅप रचून एका तरुण व्यावसायिकाला ६३ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी महिला क्रिकेटपटू फरखंदा खान (३०), तिचा भाऊ बाझिल खान (२७) आणि त्यांचा साथीदार इम्तियाज वाणी (२२) यांना अटक केली आहे.

फरखंदा खान ही मूळची जम्मू-काश्मीरची असून ती राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू आहे. तिने जम्मू-काश्मीर महिला टी-२० लीगमध्येही आपली चमक दाखवली होती. फरखंदाने पैशांच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचा रस्ता निवडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

असा रचला 'हनीट्रॅप'चा सापळा

त्यांच्या गुन्ह्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे राहणारा २८ वर्षीय तरुण व्यावसायिक २०२४ मध्ये फरखंदाच्या संपर्कात आला.
सुरुवातीला त्यांच्यात मोबाईलवर चॅटिंग सुरू झाले. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आरोपीने व्यावसायिकाला जाळ्यात ओढण्यासाठी इंटिमेट चॅटिंग करायला सुरुवात केली.

त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये फरखंदाने पैशांची मागणी सुरु केली. व्यावसायिकाने नकार देताच, तिने त्यांच्यातील खाजगी चॅट्स व्हायरल करण्याची आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

६३ लाखांची खंडणी अन् ३२ ट्रान्झॅक्शन्स

भीतीपोटी व्यावसायिकाने आरोपींना पैसे देण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात व्यावसायिकाने २३.६१ लाख रुपये ३२ वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्सद्वारे फरखंदाच्या खात्यात पाठवले. त्यानंतर फरखंदाचा भाऊ बाझिल आणि साथीदार इम्तियाज वाणी यांनी चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा ४० लाख रुपये उकळले. असे एकूण ६३.६१ लाख रुपये त्यांनी हडप केले. हे पैसे फरखंदाचा भाऊ, साथीदार आणि वडिलांच्या बँक खात्यातही वळवण्यात आले होते.

दिल्ली अन् श्रीनगरमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सततच्या धमक्यांना कंटाळून व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचे लोकेशन शोधले. फरखंदा आणि तिचा भाऊ बाझिल यांना दिल्लीतील एका नामांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्यांचा तिसरा साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगरमधून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने अशाच प्रकारे आणखी किती जणांना आपल्या जाळ्यात अडकवले याचा तपास पोलीस करत आहे.

Web Title : महिला क्रिकेटर का हनीट्रैप: व्यवसायी से ₹63 लाख लूटे, श्रीनगर में गिरफ्तारी।

Web Summary : एक राष्ट्रीय स्तर की महिला क्रिकेटर और साथियों ने एक व्यवसायी को हनीट्रैप में फंसाकर ₹63 लाख वसूले। समूह ने निजी चैट जारी करने और बलात्कार का झूठा आरोप लगाने की धमकी दी।

Web Title : Woman cricketer's honeytrap: Businessman looted of ₹63 lakhs, arrested in Srinagar.

Web Summary : A national-level woman cricketer and accomplices were arrested for honey-trapping a businessman, extorting ₹63 lakhs. The group threatened to release private chats and falsely accuse him of rape.