कोरोनाविरुद्ध ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 03:55 AM2020-09-14T03:55:26+5:302020-09-14T05:59:36+5:30

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी आपण गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट आली आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे.

'My family, my responsibility' campaign against Corona is important - Chief Minister Uddhav Thackeray | कोरोनाविरुद्ध ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्ध ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next

मुंबई : सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी आपण गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट आली आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कोरोनाचे संकटच नाही, तर इतरही वादळे आहेत. राजकीय वादळ सोडून द्या; मी अशा वादळांना घाबरत नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
पन्नासपेक्षा अधिक वयाच्या
नागरिकांना मिळणार उपचार
१५ सप्टेंबरपासून या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात आरोग्य, महसूलसह इतर शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके नेमण्यात येणार असून ही पथके किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हमीभावापेक्षा हमखास भाव
शेतकºयांना शेतमाल भावाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी ‘जे विकेल तेच पिकेल’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत कुठल्या पिकाला कुठल्या भागात बाजारपेठ उपलब्ध राहणार आहे, तसेच बाजारात कुठल्या दर्जाचे पीक अपेक्षित आहे, याचा अभ्यास कृषी विभागाकडून करण्यात येईल आणि त्याची माहिती शेतकºयांना देण्यात येईल. त्यामुळे शेतकºयांना हमीभावापेक्षा हमखास भाव मिळू शकणार आहे. तसेच शेतकºयांचा नाशिवंत शेतमाल जास्त काळ टिकविण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करण्यात येणार असून त्यामुळे मागणी असणाºया बाजारात शेतमाल विकण्यास शेतकºयांना मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: 'My family, my responsibility' campaign against Corona is important - Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.