mumbai rain live updates heavy rain mumbai and suburban | Mumbai Rains Live: मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा
Mumbai Rains Live: मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून, अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईच्या सायन येथील गांधीनगर मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून गाड्या चालवाव्या लागत आहेत. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी करत आहेत. 

LIVE

Get Latest Updates

10:59 AM

पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये मुसळधार पाऊस

09:55 AM

मुंबईतल्या किंग्ज सर्कल भागात साचलं पाणी 

09:10 AM

मध्य रेल्वेमार्गावरील सायन स्थानकात पाणी साचल्यानं मरेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने

08:46 AM

मुंबईतल्या किंग सर्कल भागात रस्त्यावर साचलं पाणी, वाहतूक ठप्प, 2 ट्रक, 1 एसटी आणि 1 बस पाण्यात अडकली

08:44 AM

सायन ते माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं दादर ते कुर्ल्यादरम्यानची वाहतूक धिम्या गतीनं

08:41 AM

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस; अनेक सखल भागात साचले पाणी

08:28 AM

कुर्ला स्थानक येथे ट्रॅकवर पाणी जमा झाले असून, कुर्ला लोकल वाहतूक मंदावली

08:22 AM

मुसळधार पावसानं सायनमधल्या सखल भागात साचलं पाणी 

08:11 AM

सायन स्थानकात पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने


Web Title: mumbai rain live updates heavy rain mumbai and suburban
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.