Heavy rains in Mumbai overnight; water logging in deep areas | मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस; अनेक सखल भागात साचले पाणी
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस; अनेक सखल भागात साचले पाणी

मुंबई - शहरात रात्रीपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात या पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचलं आहे. पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर सध्यातरी परिणाम झाला नाही. 

मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्री पासूनच पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली होती. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.    

अंधेरी, बोरिवली, दादर, प्रभादेवी, वरळी, घाटकोपर, मुलुंड अशा ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबईसह ठाणे, पालघर या भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या सायन येथील गांधी नगर मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी रात्रभर काम करत आहेत. 


मुंबईच्या हिंदमाता परिसरात पावसामुळे पाणी साचलं आहे.  

Web Title: Heavy rains in Mumbai overnight; water logging in deep areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.