‘उद्धव ठाकरे यांनी मनसेचा वापर करून घेतला, किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवत राहणार?’ संतोष धुरींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:04 IST2026-01-17T12:03:47+5:302026-01-17T12:04:37+5:30

Mumbai Municipal Corporation Election Results: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित जागा मिळवण्यात अपयश आल्यानंतर संतोष धुरी यांनी मनसेच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत मनसेचा वापर करून घेतला, अशी किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवत राहणार? असा सवाल त्यांनी  मनसेच्या नेत्यांना विचारला आहे.  

Mumbai Municipal Corporation Election Results: ‘Uddhav Thackeray used MNS, how many years will he continue to win over others?’ Santosh Dhuri questions | ‘उद्धव ठाकरे यांनी मनसेचा वापर करून घेतला, किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवत राहणार?’ संतोष धुरींचा सवाल

‘उद्धव ठाकरे यांनी मनसेचा वापर करून घेतला, किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवत राहणार?’ संतोष धुरींचा सवाल

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऐन भरात असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असलेल्या संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. तसेच राज ठाकरे यांनी पक्ष सरेंडर केला असून, मनसेला निवडणुकीत ७-८ जागाच मिळतील, असा दावा केला होता. दरम्यान, काल लागलेल्या निकालांनमधून संतोष धुरी यांनी केलेलं हे भाकित खरं ठरलं असून, मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर आता संतोष धुरी यांनी मनसेच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत मनसेचा वापर करून घेतला, अशी किती वर्षे दुसऱ्यांना जिंकवत राहणार? असा सवाल त्यांनी  मनसेच्या नेत्यांना विचारला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना संतोष धुरी म्हणाले की, तुम्ही युतीमध्ये आल्यानंतर उद्धवसेनेच्या ज्या जागा ३५ ते ४० पर्यंत खाली येणार होत्या. त्यांच्या जागा ६०च्या वर गेल्या. तुम्ही कुठे अडकलात. तुमचा वापर करण्यात आला, ही बाब तुमच्या लक्षातच येत नाही. अजून किती वर्षे तुम्ही दुसऱ्यांना जिंकवत राहणार आहात? दुसऱ्यांना नका जिंकवू, स्वत:साठी काही तरी करा. जे कार्यकर्ते तुमच्यावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करा, असा टोला संतोष धुरी यांनी लगावला.

नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू परस्परांमधील मतभेद मिटवत तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले होते. या निवडणुकीत उद्धवसेनेने १६३ तर मनसेने ५३ जागांवर आपले उमेदवार दिले होते. तसेच ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणं बदलून उद्धवसेना आणि मनसेचा विजय होईल, असे दावे केले जात होते.  मात्र काल लागलेल्या निकालांमध्ये उद्धवसेनेला ६५ तर मनसेला केवळ ६ जागांवर विजय मिळवता आला होता.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धवसेना आणि मनसेमध्ये युतीची चर्चा आणि जागावाटपाच्या वाटाघाटींच्या चर्चाेमधून संतोष धुरी यांना दूर ठेवण्यात आले होते. तसेच 

Web Title : ठाकरे ने मनसे का इस्तेमाल किया, कब तक दूसरों को जिताते रहोगे?

Web Summary : संतोष धुरी ने बीएमसी चुनावों के बाद मनसे नेतृत्व की आलोचना की, आरोप लगाया कि उद्धव ठाकरे ने उनका इस्तेमाल किया। धुरी ने सवाल किया कि मनसे कब तक दूसरों को जिताती रहेगी, अपने दल और कार्यकर्ताओं पर ध्यान केंद्रित करने के बजाय, हालिया गठबंधन और निराशाजनक परिणामों का हवाला दिया।

Web Title : Thackeray used MNS, how long will you make others win?

Web Summary : Santosh Dhuri criticizes MNS leadership after BMC elections, alleging Uddhav Thackeray exploited them. Dhuri questions how long MNS will help others win instead of focusing on their own party and workers, referencing the recent alliance and disappointing results.