मुंबईवर मळभ

By Admin | Updated: May 31, 2015 01:58 IST2015-05-31T01:58:02+5:302015-05-31T01:58:02+5:30

गेले काही दिवस तापमानवाढीमुळे तापलेल्या मुंबईत शनिवारी सकाळपासूनच मळभ आले होते. दुपारपर्यंत आकाशात ढगांची दाटी झाल्यामुळे मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळाला.

Mumba on Mumbai | मुंबईवर मळभ

मुंबईवर मळभ

मुंबई : गेले काही दिवस तापमानवाढीमुळे तापलेल्या मुंबईत शनिवारी सकाळपासूनच मळभ आले होते. दुपारपर्यंत आकाशात ढगांची दाटी झाल्यामुळे मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळाला. शहरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.
१६ मे रोजी अंदमानात दाखल झालेला मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रत्यक्षात मात्र मान्सूनची केरळातील आगमनाची तारीख हुकली असून, आता पुढील ४८ तासांत म्हणजे ३१ मे किंवा १ जून रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्यांना उन्हाने चांगलेच चटके दिले असून, मुंबईकरांना उन्हासह उकाड्यालाही सामोरे जावे लागत आहे. मागील पंधरा दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांवर नोंदविण्यात येते आहे. शिवाय आर्द्रताही ७५ टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
परिणामी वाढत्या उन्हासह उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारच्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता काहीशी कमी झाली. (प्रतिनिधी)

शनिवारचे तापमान
वेधशाळाकमालकिमान
कुलाबा३३.८२९.५
सांताक्रूझ३४.७२९.७

Web Title: Mumba on Mumbai