Maharashtra Cabinet Ministers Full List 2019:'हे' आहेत आज शपथ घेणारे 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:53 AM2019-12-30T11:53:50+5:302019-12-30T12:08:55+5:30

Maharashtra Cabinet Ministers Full List 2019 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सहीचं पत्र लोकमतच्या हाती लागलं असून

Maharashtra Cabinet Expansion: There are 25 cabinet and 10 state ministers sworn in today | Maharashtra Cabinet Ministers Full List 2019:'हे' आहेत आज शपथ घेणारे 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री

Maharashtra Cabinet Ministers Full List 2019:'हे' आहेत आज शपथ घेणारे 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री

googlenewsNext

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरेसुद्धामंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तर 10 राज्यमंत्री असतील. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सहीचं पत्र लोकमतच्या हाती लागलं असून त्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यात आली आहे. या यादीत 25 व्या नंबरवर आदित्य ठाकरेंचं नाव आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हेही मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. उद्धव ठाकरेंच्या सहीची ही यादी हाती लागली आहे. आदित्य यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं, शेवटपर्यंत कोणालाही आदित्य मंत्रिमंडळात येणार आहेत याचा सुगावा लागू दिला नव्हता. मात्र, राज्यपालांकडे जेव्हा रात्री उशिरा यादी गेली, त्यात आदित्य ठाकरेंचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत सगळ्यात शेवटचे नाव असल्याचे समजते.

* उपमुख्यमंत्री - अजित पवार

* 25 कॅबिनेट मंत्री 

अशोक शंकरराव चव्हाण
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
विजय वडेट्टीवार
अनिल देशमुख
हसन मुश्रिफ
श्रीमती वर्षा गायकवाड
डॉ.राजेंद्र शिंगणे 
नवाब मिलक
राजेश टोपे
सुनिल केदार
संजय राठोड 
गुलाबराव पाटील
अमित विलासराव देशमुख
दादा भिसे
जितेंद्र आव्हाड
संदिपान भुमरे
आदित्य ठाकरे
असलम शेख
शंकरराव गडाख
के. सी. पाडवी
उदय सामंत
अनिल परब
यशोमती ठाकूर
बाळासाहेब पाटील

* 10 राज्यमंत्रिपद

अब्दुल सत्तार
सतेज पाटील
शंभूराज देसाई
बच्चू कडू
विश्वजीत कदम
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
राजेंद्र पाटील यड्रावकर

Web Title: Maharashtra Cabinet Expansion: There are 25 cabinet and 10 state ministers sworn in today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.