‘लोकमत’ चे ट्रेंड सेटर्स, लाइफस्टाईल आयकॉन सोहळे आज रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 01:30 AM2021-01-23T01:30:27+5:302021-01-23T06:46:52+5:30

या सोहळ्यात २५ आयकॉनचा गौरव होणार आहे. त्यास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, अभिनेता स्वप्निल जोशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Lokmat trend setters, lifestyle icon ceremonies today | ‘लोकमत’ चे ट्रेंड सेटर्स, लाइफस्टाईल आयकॉन सोहळे आज रंगणार

‘लोकमत’ चे ट्रेंड सेटर्स, लाइफस्टाईल आयकॉन सोहळे आज रंगणार

Next

मुंबई : समाजातील उत्तम गोष्टींचा गौरव करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’चा सदैव पुढाकार असतो. याच मालिकेत आज, शनिवार, दि. २३ जानेवारी रोजी विलेपार्ले येथे दोन सत्रांमध्ये ‘लाईफस्टाईल आयकॉन २०२०’ आणि ‘ट्रेंड सेटर्स’ हे दोन पुरस्कार सोहळे रंगणार आहेत.
सहारा स्टार या हॉटेलच्या सभागृहात लाईफस्टाईल आयकॉन २०२० हा पहिला दिमाखदार सोहळा सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

या सोहळ्यात २५ आयकॉनचा गौरव होणार आहे. त्यास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, अभिनेता स्वप्निल जोशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे ज्वेलरी पार्टनर लागू बंधू मोतीवाले प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत, तर रिचमोंड इंडिया ग्रुप हे इव्हेंट पार्टनर आहेत.



दुसरा सोहळा ट्रेंड सेटर्स पुरस्काराचा आहे. तो याच सभागृहात सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात सुमारे ३४ ट्रेंड सेटर्सचा गौरव करण्यात येणार आहे.या सोहळ्यास जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता नागराज मंजुळे तसेच ‘लोकमत’ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही सोहळे निमंत्रितांसाठी असून, कोरोना काळातील सर्व बंधने पाळून त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Lokmat trend setters, lifestyle icon ceremonies today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.