किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 05:56 IST2026-02-17T05:55:25+5:302026-02-17T05:56:31+5:30

बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसशी निगडीत बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिंदेसेनेला दिले जाणार असल्याने ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची निवड निश्चित मानली जात आहे.  

Kishori Pednekar becomes the first woman opposition leader in Mumbai Municipal Corporation; First woman to chair BEST committee? | किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?

किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?

मुंबई : महापालिकेत महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्यानंतर आता उद्धवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा झाली. त्यानिमित्ताने किशोरी पेडणेकर या मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेत महिला राज पहायला मिळणार आहे.

२००० साली विरोधी पक्षनेता पद अस्तित्त्वात आल्यानंतर गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पदी  महिलेची नियुक्ती झाली आहे. किशोरी पेडणेकर यांना महापौर पदाचा अनुभवही असल्याने विरोधी पक्षनेते या त्यांच्या भूमिकेला प्रशासकीय धार दिसणार आहे.   मुंबई पालिकेत १९९८ मध्ये महापौरांसह परिषद पद्धती लागू केली होती. त्यानंतर १९९९ मध्ये ही पद्धत रद्द करून पुन्हा जुनी पद्धत आणली. याच दरम्यान उपमहापौर व विरोधी पक्षनेता या पदांची तरतूद केली. विरोधी पक्षनेतेपद २००० पासून अस्तित्वात  असून  पंचवीस वर्षांतील किशोरी पेडणेकर या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. आतापर्यंत काँग्रेसकडे असलेले हे पद पहिल्यांदाच उद्धवसेनेला मिळाल्यामुळे आतापर्यंत सत्तेत असलेले उद्धवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्ष म्हणून कशी कामगिरी बजावणार याबाबत उत्सुकता  आहे.

गणेश खणकर भाजपचे  पहिले सभागृहनेते

गणेश खणकर यांच्या नियुक्तीमुळे भाजपलाही पहिला सभागृहनेता मिळाला. महासभेदरम्यान सर्व पक्षीय गटनेत्यांची नावेही महापौरांकडून अधिकृतरीत्या जाहीर केली. गटनेत्यांना पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात दालनासह त्यांच्या गाडीवर पालिकेचा लोगो असलेला झेंडा लावण्याची परवानगी राहील.  गटनेत्यांना महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत सहभागी होता येणार आहे.

या नगरसेवकांना लॉटरी

शिंदेसेनेत दाखल झाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांना स्थायी समिती सदस्य पद तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे  अजित रावराणे यांना सुधार समितीचे सदस्यपद मिळाले.

यापूर्वीचे विरोधी पक्षनेते

खा. मो. हा. अ. बस्तीवाला २०००-२०००३

गुणवंत शेठ     २००३- २००४

राजहंस सिंह     २००४- २०१२

ज्ञानराज निकम  २०१२- २०१३

देवेंद्र आंबेरकर   २०१३- २०१६

प्रवीण छेडा      २०१६- २०१७

रवी राजा       २०१७- २०२१

बेस्ट समितीवरही महिलाच

बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी शिंदेसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची निवड निश्चित असेल. त्यामुळे या समितीवरही प्रथमच महिला असेल.तर माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांची बिगर पालिका सदस्य म्हणून निवड झाली.

पक्ष    गटनेते

भाजप   गणेश खणकर

                (सभागृह नेते )

उद्धवसेना      किशोरी पेडणेकर

                ( विरोधी पक्षनेत्या)

शिंदेसना अमेय घोले

काँग्रेस  अशरफ आझमी

एमआयएम      विजय उबाळे

सपा    अमरीन अब्राहनी

Web Title : किशोरी पेडणेकर: मुंबई पालिका में पहली महिला विपक्ष नेता

Web Summary : किशोरी पेडणेकर मुंबई में पहली महिला विपक्ष नेता बनीं। गणेश खणकर पहले भाजपा सदन नेता हैं। स्थायी समिति के नेतृत्व के लिए प्रतिस्पर्धा है। तृष्णा विश्वासराव बेस्ट समिति की अध्यक्ष बनने की संभावना है।

Web Title : Kishori Pednekar: First Woman Opposition Leader in Mumbai Municipal Corporation

Web Summary : Kishori Pednekar becomes the first female opposition leader in Mumbai. Ganesh Khankar is the first BJP house leader. Competition arises for the Standing Committee's leadership. Trishana Viswasrao is likely to be Best Committee's chair.