होळी झाली, आता परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, सविस्तर वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:37 IST2026-03-03T14:35:16+5:302026-03-03T14:37:19+5:30
Special Trains On Konkan Railway After Holi 2026: प्रवाशांनी या विशेष ट्रेन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

होळी झाली, आता परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, सविस्तर वेळापत्रक
Special Trains On Konkan Railway After Holi 2026: कोकणातील होळी, शिमगोत्सव झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकणरेल्वेवर अतिरिक्त विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे द्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
पनवेल - मडगांव - पनवेल विशेष (२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०११०५ विशेष दिनांक ०५.०३.२०२६ (गुरुवार) रोजी पनवेल येथून ०५.४५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १८.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०११०६ विशेष दिनांक ०४.०३.२०२६ (बुधवार) रोजी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ४.०० वाजता पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
संरचना: १८ शयनयान आणि २ द्वितीय बैठकसह गार्ड ब्रेक व्हॅन.
सीएसएमटी - मडगाव द्विसाप्ताहिक विशेष
सीएसएमटी - मडगाव द्विसाप्ताहिक विशेष (०१०४९/०१०५०): मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान गाडी क्रमांक ०१०४९ ही विशेष गाडी ३ मार्च आणि ६ मार्च २०२६ रोजी धावणार आहे. ही गाडी मध्यरात्री १२:३० वाजता मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०५० मडगावहून ३ आणि ६ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:२० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीला एकूण २० डबे असून, त्यामध्ये १८ कोच "३-टियर एसी इकॉनॉमी" श्रेणीचे असतील.
एलटीटी मडगाव विशेष (०१०४७/०१०४८) : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ७ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजता विशेष गाडी (०१०४७) सुटेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०४८ मडगावहून ८ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता सुटेल. या गाडीत २-टियर एसी, ३-टियर एसी, स्लीपर आणि जनरल असे एकूण २२ डबे असतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.