व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असलेल्या नर्सिंग होममध्ये कोविड उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:40 AM2020-09-18T02:40:12+5:302020-09-18T02:53:04+5:30

आॅगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवसांवर गेल्याने पालिकेने काही छोट्या रुग्णालयांमध्ये नॉन कोविड उपचारांना परवानगी दिली. मात्र १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

Covid treatment in a nursing home with ventilator, oxygen | व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असलेल्या नर्सिंग होममध्ये कोविड उपचार

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असलेल्या नर्सिंग होममध्ये कोविड उपचार

googlenewsNext

मुंबई : कोविड (कोरोना) रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने काही नर्सिंग होमला पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र चांगली सुविधा असलेला अतिदक्षता विभाग, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय तज्ज्ञ संबंधित नर्सिंग होममध्ये असावेत, अशी अट पालिकेने घातली आहे.
आॅगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवसांवर गेल्याने पालिकेने काही छोट्या रुग्णालयांमध्ये नॉन कोविड उपचारांना परवानगी दिली. मात्र १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे खाटांची संख्या कमी पडू नये, यासाठी पालिकेने पुन्हा काही नर्सिंग होममध्ये ८० टक्के खाटा कोरना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. मात्र बऱ्याचदा या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय यंत्रणा नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतते.
रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी बराच वेळा अतिदक्षता विभाग सक्षम नसतात. तसेच आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची कमतरता भासते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्यामुळे ७२ नर्सिंग होमना कोविडवर उपचार करण्यास मनाई करण्यात आली होती.
परंतु गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार, आता २७ नर्सिंग होममध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विशेष राखीव खाटांची व्यवस्था
मुंबईतील २७ नर्सिंग होममधील ८० टक्के खाटा तसेच अतिदक्षता विभागातील खाटा या कोविड रुग्णांसाठी राखीव असतील. पालिकेच्या विभाग कार्यालयातील वॉर रूममधून गरजू रुग्णांना या खाटांवर दाखल केले जाईल.
राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार या रुग्णालयांना संबधित रुग्णांना बिल आकारता येईल. या नर्सिंग होममधील एकूण १४३८ खाट आणि अतिदक्षता विभागातील १५१ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध होतील.

Web Title: Covid treatment in a nursing home with ventilator, oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.