CoronaVirus News : जसलोक संपूर्ण कोविड रुग्णालय करण्याचा पालिकेचा निर्णय मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:56 AM2021-04-17T06:56:58+5:302021-04-17T06:57:13+5:30

CoronaVirus News: काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पालिकेने पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय पूर्णत: कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला. असे परिपत्रकही आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केले.

CoronaVirus News: The decision of the municipality to make Jaslok a complete Kovid hospital is behind | CoronaVirus News : जसलोक संपूर्ण कोविड रुग्णालय करण्याचा पालिकेचा निर्णय मागे

CoronaVirus News : जसलोक संपूर्ण कोविड रुग्णालय करण्याचा पालिकेचा निर्णय मागे

Next

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईत खाटांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे व लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हॉटेलमध्येही क्वारंटाईन होण्याची सोय नुकतीच केली आहे. त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील जसलोक रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र काही तासांतच हा निर्णय मागे घेत आता येथील १७५ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असणार आहेत.
काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पालिकेने पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय पूर्णत: कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला. असे परिपत्रकही आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केले. त्यानुसार जसलोक रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना दाखल केले जाणार नव्हते. सध्या दाखल अन्य रुग्णांनाही इतर रुग्णालयांत हलविण्यात येणार होते.
शनिवारी सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. त्यापूर्वीच महापालिकेने आपला निर्णय शुक्रवारी मागे घेतला. 
यामुळे पालिकेच्या निर्णयात बदल
जसलोक रुग्णालयात सध्या कर्करोगावर उपचार घेणारे ३० रुग्ण, तर हृदयविकार व अन्य गंभीर आजारांवर उपचार घेणारे २२ रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने अन्य रुग्णालयांमध्ये हलविणे धोकादायक ठरेल. त्यामुळे महापालिकेने आता जसलोक रुग्णालयात उपलब्ध २२७ खाटांपैकी १७५ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २९ खाटा अतिदक्षता विभागासाठी राखीव असणार आहेत.

Web Title: CoronaVirus News: The decision of the municipality to make Jaslok a complete Kovid hospital is behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.