Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव मनपातील शिंदेसेना, एमआयएमचे नगरसेवक शहरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:06 IST2026-01-24T12:06:21+5:302026-01-24T12:06:34+5:30

Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव येथील महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने मनपामधील सत्तास्थापनेस वेग आला आहे.

Malegaon Municipal Election Result 2026 Shinde Sena, MIM corporators in Malegaon Municipal Corporation in the city | Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव मनपातील शिंदेसेना, एमआयएमचे नगरसेवक शहरात

Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव मनपातील शिंदेसेना, एमआयएमचे नगरसेवक शहरात

मालेगाव येथील महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने मनपामधील सत्तास्थापनेस वेग आला आहे. असे असले तरी शिंदेसेनेत मात्र शांतता असून, त्यांचे तसेच एमआयएमचे नगरसेवक शहरात आहेत.

मनपा निवडणुकीत निकालात शिंदेसेनेला १८ जागा मिळाल्या असून, सत्तास्थापनेत त्यांचा रोल अद्याप समोर आलेला नाही, या उलट इस्लाम व समाजवादी पक्षाने आपल्या नगरसेवकांची पळवापळवी टाळण्यासाठी त्यांना बाहेरगावी पाठविले आहे. असे असले तरी शिंदेसेना व एमआयएम यांचे नगरसेवक मात्र शहरात असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे मनपामध्ये सत्तास्थापनेत सहभागी होणाऱ्या काँग्रेसचे तीन नगरसेवक असून, त्यात शहराध्यक्ष एजाज बेग व त्यांच्या पत्नी या दोघांचा समावेश आहे. त्यांचे तीनही नगरसेवक सध्या शहरात आहेत.

शिंदेसेनेचा गटनेता लवकरच ठरणार

इस्लाम पाठोपाठ समाजवादी पक्षाने आपला गटनेता निश्चित केला असून, तशी नोंदणी केली आहे. एमआयएमच्या गटनेतेपदी माजी महापौर अब्दुल मलिक यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

असे असले तरी १८ जागा मिळवत मनपात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणाऱ्या शिंदेसेनेने अद्याप आपला गटनेता घोषित केलेला नाही. या निवडीसाठी आगामी दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. त्यात मंत्री दादा भुसे हे गटनेत्याचे नाव निश्चित करणार असल्याचे बोलले जाते. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नगरसेवक शहरात आहेत. भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले असून, गटनेतेपदी मदन गायकवाड यांची वर्णी लागणार असल्याचे समजते.
 

Web Title : मालेगांव महानगरपालिका: शिंदे सेना, एमआईएम पार्षद शहर में।

Web Summary : मालेगांव में महापौर चुनाव तेज। शिंदे सेना और एमआईएम पार्षद शहर में, जबकि अन्य दलबदल से बचने के लिए अपने पार्षदों को बाहर ले गए। शिंदे सेना ने अभी तक नेता घोषित नहीं किया।

Web Title : Malegaon Municipal Corporation: Shinde Sena, MIM corporators in the city.

Web Summary : Malegaon's mayoral election heats up. Shinde Sena and MIM corporators remain in the city, while others move theirs to avoid poaching. Shinde Sena yet to declare leader.