Malegaon Municipal Election Result 2026 : इच्छुकांचे लक्ष आता स्वीकृत नगरसेवकपदाकडे, यंदा आठ जणांना मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:52 IST2026-01-19T16:50:55+5:302026-01-19T16:52:26+5:30

Malegaon Municipal Election Result 2026 : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. इस्लाम पार्टीने सर्वाधिक ३५ जागा मिळवत आघाडी घेतली आहे, तर शिंदेसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत.

Malegaon Municipal Election Result 2026 Aspirants' attention is now on the approved corporator post, eight people will get the opportunity this year | Malegaon Municipal Election Result 2026 : इच्छुकांचे लक्ष आता स्वीकृत नगरसेवकपदाकडे, यंदा आठ जणांना मिळणार संधी

Malegaon Municipal Election Result 2026 : इच्छुकांचे लक्ष आता स्वीकृत नगरसेवकपदाकडे, यंदा आठ जणांना मिळणार संधी

आशिष मांडगे

मालेगाव: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. इस्लाम पार्टीने सर्वाधिक ३५ जागा मिळवत आघाडी घेतली आहे, तर शिंदेसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४३ सदस्यांचे बहुमत गरजेचे आहे. संख्याबळानुसार विविध राजकीय समीकरणे व युतींचे फॉर्म्युले चर्चेत आले आहेत. दरम्यान आता इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

निवडणुकांचा धुरळा शांत होत नाही, तोच आता सर्वांचे लक्ष 'स्वीकृत सदस्य' निवडीकडे लागले आहे. मागील महापालिकेत ५ स्वीकृत सदस्य होते. मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडून आलेल्या महापालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या १० टक्क्यांपेक्षा ही संख्या अधिक नसणार आहे.

यावेळी मालेगाव महापालिकेत एकूण ८ स्वीकृत नगरसेवक असण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या एकूण संख्येच्या दहा टक्के स्वीकृत सदस्य असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. महापालिकेत ८४ सदस्य निवडून आले असल्याने स्वीकृत नगरसेवकांची संख्या ८ असणार आहे.

संख्याबळानुसार इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या संयुक्त सेक्युलर फ्रंटला स्वीकृत सदस्यांच्या सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने त्या पक्षांमधील इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते, संघटनात्मकदृष्ट्वा महत्त्वाची भूमिका बजावलेले नेते तसेच निवडणुकीत तिकीट न मिळालेले अनेक नेते स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या नेत्यांचा विचार

स्वीकृत नगरसेवक पदाकडे राजकीय पक्षांकडून विशेष लक्ष दिले जाते. निवडणुकीत तिकीट न मिळालेले, अत्यल्प फरकाने पराभूत झालेले किंवा महत्त्वाची भूमिका बजावणारे नेत्यांना संधी दिली जाते. त्यामुळे सभागृहातील पक्षांची ताकद व अनुभवींना सक्रिय ठेवले जाते.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी
विजयी सदस्य आणि अपेक्षित जागा
इस्लाम (३५)+सपा (५) - ४
एमआयएम (२१) - २
शिंदेसेना (१८) - १ किंवा २

स्वीकृत नगरसेवक निवडीबाबतचे नियम

मनपा प्रशासनाच्या नियमानुसार, निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांची विभागणी केली जाते. नवीन विधेयकानुसार निवडून आलेल्या १० सदस्यांमागे १ स्वीकृत सदस्य हे सूत्र लागू आहे.

८४ सदस्यांच्या सभागृहात नियुक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ हा महापालिकेच्या सभागृहाच्या कार्यकाळाइतकाच असतो.

सेक्युलर फ्रंट, एमआयएम व शिंदेसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने एक वर्षांनंतर स्वीकृत सदस्याचा राजीनामा घेऊन नवीन सदस्याला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मागील निवडणुकीत नियुक्त पाचही स्वीकृत नगरसेवक संपूर्ण ५ वर्षे कार्यरत होते.
 

Web Title : मालेगांव: मनोनीत पार्षदों पर निगाहें, इस साल आठ अवसर

Web Summary : मालेगांव में किसी भी दल को स्पष्ट बहुमत नहीं मिलने से मनोनीत पार्षदों पर ध्यान केंद्रित है। आठ पद संभावित हैं, जो विभिन्न दलों के उम्मीदवारों को आकर्षित कर रहे हैं। वरिष्ठ नेता और टिकट से चूकने वाले इन भूमिकाओं के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जो सदन में पार्टी की ताकत के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Malegaon: Eyes on Co-opted Councillors, Eight Opportunities This Year

Web Summary : With no clear majority in Malegaon, focus shifts to co-opted councillors. Eight positions are likely, attracting aspirants from various parties. Senior leaders and those who missed tickets are vying for these roles, crucial for party strength in the house.