Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:24 IST2026-01-09T14:22:39+5:302026-01-09T14:24:15+5:30
Malegaon Municipal Election 2026 : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने नितीन पोफळे व विवेक वारुळे या बंडखोरांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
मालेगाव कॅम्प : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने नितीन पोफळे व विवेक वारुळे या बंडखोरांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील आदेशानुसार या दोघांची हकालपट्टी माहिती जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी दिली.
मालेगावात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युतीवरून बरेच रणकंदन माजले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही युतीला विरोध दर्शवित भाजपने स्वतंत्र लढण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेकांना उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना अंतिम मतदारयादीत अनेकांचे तिकीट कापले गेले होते. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी महानगरप्रमुख पद भूषवलेले नितीन पोफळे यांचा पत्ता कट झाला होता, तर माजी महानगरप्रमुख विवेक वारुळे हे आपल्या पत्नीसाठी आग्रही होते. मात्र, त्यांच्या पत्नीलाही तिकीट न मिळाल्याने या दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला.
वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
पोफळे आणि वारुळे यांच्या बंडखोरीमुळे भाजपचे माजी गटनेता सुनील गायकवाड व राजश्री गीते यांना या भाजपच्या अधिकृत उमेदवारांना भाजपतील अपक्ष बंडखोरांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार गेल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर पक्षशिस्तीचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष कचवे यांनी या दोघांना निलंबित केले.