...जेंव्हा भाजप आमदारावर येते गावकऱ्यांसमोर डोकं फोडून घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 22:33 IST2019-10-09T16:58:44+5:302019-10-09T22:33:51+5:30
बाबरगाव येथील गावकरी बंब यांचे भाषण ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यामुळे बंब चांगलेच संतापले, मला तुम्ही लोकं बोलू देत नाही. त्यामुळे शेवटी मीच डोके फोडून घेतो असं म्हणताना बंब दिसतात.

...जेंव्हा भाजप आमदारावर येते गावकऱ्यांसमोर डोकं फोडून घेण्याची वेळ
मुंबई : मतदारांना आकर्षीत करण्यासाठी विविध पक्षांचे आमदार मतदारसंघ पिजून काढत आहे. गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब हे देखील मतदारसंघात विविध गावांत जाऊन गावकऱ्यांच्या भेटी घेत असून केलेल्या कामांची माहिती देत आहेत. मात्र बाबरगावमध्ये भाषण करत असताना येथील गावकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करून बंब यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैतागलेल्या बंब यांनी मी डोक फोडून घेऊ का, असा सवाल उपस्थितांना केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजप उमेदवार बंब ग्रामीण भागात ठीक-ठिकाणी बैठका घेत आहेत. त्यांच्या अशाच एका बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, ज्यात त्यांना बाबरगाव येथे गावकऱ्यांनी भाषण करण्यापासून रोखल्याचे दिसत आहे. तुम्हाला आज आमच्या गावाची आठवण झाली का ? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी बंब यांच्या कार्यकर्त्याने संतापलेल्या गावकऱ्याची समजूत काढली. त्यानंतर बंब यांनी उपस्थितांना संबोधीत केले.बंब यांना ग्रामीण भागातील काही ठिकाणी विरोध होत आहे. याआधी सुद्धा त्यांना आगरवाडगावात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यानी विरोध केला होता. याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता.
बाबरगाव येथील गावकरी बंब यांचे भाषण ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यामुळे बंब चांगलेच संतापले, मला तुम्ही लोकं बोलू देत नाही. त्यामुळे शेवटी मीच डोके फोडून घेतो असं म्हणताना बंब दिसतात. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडिया मोठ्याप्रमाणावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.