महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात एका मतदान केंद्रावर आश्चर्यकारक घटना पाहाला मिळाली. नवापूर मतदान केंद्रावर मतदान करायला महाराष्ट्रातील मतदार आले होते. मात्र, त्यांची रांग गुजरातमध्ये लागली होती. 


नवापूर हे गाव खरेतर नंदूरबार मतदारसंघात येते. या गावातील रेल्वेस्थानकही अर्धे गुजरात तर अर्धे महाराष्ट्रात येते. यामुळे कायदेही तसेच लागू होतात. या मतदान केंद्राची भौगोलिक स्थितीही आश्चर्यकारक आहे. मतदान केंद्राच्या पूर्वेला महाराष्ट्र आणि पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला गुजरातची सीमा आहे. 


नवापूरच्या शाळेमध्य़े मतदान केंद्र होते. ही शाळा महाराष्ट्रात आहे तर तिचे गेट गुजरातच्या सीमेवर आहे. यामुळे मतदानासाठी मतदारांना रांग गुजरातमध्ये लावावी लागली होती. हा प्रकार निवडणुकीवेळी नेहमीच होत असतो. 


1 मे 1960 मध्ये विभाजन झाले त्याआधी महाराष्ट्र आणि गुजरात मुंबई प्रांतामध्ये येत होते. विभाजनानंतर महाराष्ट्र, गुरजार राज्यांची निर्मिती झाली. यामुळे सीमेवरील गावेही वाटली गेली. मात्र, अनेक ठिकाणी घर महाराष्ट्रात आणि उर्वरित जागा गुजरातमध्ये असल्याचे आढळते. 


 

शाळेत मराठी, गुजरातीही शिकवतात
नवापुरच्या जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषा शिकविल्या जातात. या शाळेची स्थापना इंग्रजांच्या काळात 1927 मध्ये झाली होती. या शाळेत गुजराती भाषा पहिलीपासून ते सातवीपर्यंत शिकविली जाते. 

Web Title: Voting center in Maharashtra and ques in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.