Video: मला बघा, मला बघा... अतिउत्साही कार्यकर्त्याला पवारांनी बाजुला सारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:08 IST2019-10-11T13:08:13+5:302019-10-11T13:08:22+5:30
मध्ये-मध्ये लुडबूड करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला पवारांनी अलगदपणे बाजुला सारले.

Video: मला बघा, मला बघा... अतिउत्साही कार्यकर्त्याला पवारांनी बाजुला सारले
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. पवारांच्या या दौऱ्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर येथील वडेगाव येथे शरद पवार प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी, मध्ये-मध्ये लुडबूड करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला पवारांनी अलगदपणे बाजुला सारले.
बाळापूर मतदारसंघात संग्राम गुलाबराव गावंडे यांना राष्ट्रवादीने आपली उमेदवारी दिली आहे. बाळापूरमधील गावंडेंच्या प्रचारासाठी शरद पवार वडेगाव येथे सभेला गेले होते.सभास्थळी दाखल झाल्यानंतर तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात येत होता. मोठा पुष्पहार गळ्यात घालून शरद पवारांचा सत्कार करताना एका अतिउत्साही कार्यकर्त्याला पवारांनी बाजूला केले. पवारांना परिधान करण्यात येणाऱ्या पुष्पहारात कार्यकर्त्याने डोकं घातलं. पण, पवारांनी पद्धतशीरपणे आपल्या हाताने त्यास बाजुला केले. सोशल मीडियावर कार्यकर्त्याचा हा अतिउत्साहीपणा किंवा मला बघा मला बघा... वृत्तीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.