महानगरपालिका निवडणुकीत उद्धव सेनेला फक्त दोनच ठिकाणी गाठता आला 'डबल डिजिट'! बघा आतापर्यंतची आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:59 IST2026-01-16T17:57:26+5:302026-01-16T17:59:12+5:30
...मात्र मनसेसोबत युती करूनही उद्धव सेनेला केवळ २ महानगर पालिकांमध्येच डबल डिजिट गाठता आले.

महानगरपालिका निवडणुकीत उद्धव सेनेला फक्त दोनच ठिकाणी गाठता आला 'डबल डिजिट'! बघा आतापर्यंतची आकडेवारी
राज्यात गुरुवारी पार पडलेल्या २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीचे निकाल येत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचे एक आकर्षण होते, ते म्हणजे ठाकरे बंधूंची बहुप्रतिक्षित युती. या निवडणुकांसाठी उद्धव सेनेने काही ठिकाणी मनसेसोबत युती केली होती. मात्र मनसेसोबत युती करूनही उद्धव सेनेला केवळ २ महानगर पालिकांमध्येच डबल डिजिट गाठता आले.
मुंबईमहानगर पालिकेत उद्धव सेना आणि मनसे युतीने भाजप-शिंदेसेना महायुतीचा सामना करण्यासाठी 'मराठी' मुद्द्याचे आयुध वापरले होते. युतीच्या या आयुधाला भाजप-शिंदेसेना-रिपाईंच्या महायुतीने 'मराठी हिंदू' अस्त्राचा वापर करत शह दिला आणि गेल्या साधारणपणे २५ वर्षांचा उद्धव सेनेचा बालेकिल्ला ढासळला. महत्वाचे म्हणजे, आता इतिहासात पहिल्यांदाच बृहनमुंबई महानगर पालिकेवर भाजपचा महापौर बसू शकतो.
उद्धव सेनेचे कुठे किती उमेदवार विजयी/आघाडीवर? -
मुंबई - ५७
पुणे - ००
नागपूर - ०१
छत्रपती-संभाजी-नगर - ६
पिंपरी-चिंचवड - ००
ठाणे - ०१
नाशिक - ०९
नवी-मुंबई - ०२
कल्याण-डोंबिवली - ०८
कोल्हापूर - ०१
सांगली-मिरज-कुपवाड - ००
सोलापूर - ००
लातूर - ००
अहिल्यानंगर - ०१
अमरावती - ०१
नांदेड-वाघाळा - ००
जळगाव - ०५
जालना - ००
चंद्रपूर - ०६
वसई-विरार - ००
मालेगाव - --
अकोला - ०५
पनवेल - ०५
मीरा-भाईंदर - ००
धुळे - ००
परभणी - २४
उल्हासनगर - ००
भिवंडी-निजामपूर - ००
इचलकरंजी - --
या निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय होताना दिसत आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणावर उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.