‘विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही’, जयंत पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना सुनावले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:04 IST2026-01-06T16:02:43+5:302026-01-06T16:04:33+5:30

कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. 

‘The memory of Vilasrao Deshmukh will never be erased’, Jayant Patil told Ravindra Chavan | ‘विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही’, जयंत पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना सुनावले   

‘विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही’, जयंत पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना सुनावले   

सांगली - दिवंगत विलासराव देशमुख यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यंमत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी निषेध नोंदवला. जयंत पाटील म्हटले की, कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा गांधींचीही हत्या केली गेली पण गांधींचा विचार आजही जिवंत आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान पुसले जाऊ शकत नाही,

Web Title : विलासराव देशमुख की यादें अमिट, जयंत पाटिल ने रविंद्र चव्हाण को याद दिलाया।

Web Summary : जयंत पाटिल ने महाराष्ट्र के विकास में विलासराव देशमुख के योगदान की सराहना की, उनके स्थायी प्रभाव पर जोर दिया। उन्होंने रविंद्र चव्हाण की टिप्पणियों की निंदा करते हुए कहा कि देशमुख के काम और विचार महात्मा गांधी की स्थायी विरासत की तरह अविस्मरणीय हैं।

Web Title : Vilasrao Deshmukh's memory indelible, Jayant Patil reminds Ravindra Chavan.

Web Summary : Jayant Patil lauded Vilasrao Deshmukh's contributions to Maharashtra's development, emphasizing his lasting impact. He condemned Ravindra Chavan's remarks, asserting that Deshmukh's work and ideas remain unforgettable, like Mahatma Gandhi's enduring legacy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.