शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला वाचनालयात बसवलं; दहिसरमधील शाळेच्या चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:52 IST2026-02-01T12:44:48+5:302026-02-01T12:52:28+5:30

Dahisar School Fee Controversy: दहिसर येथील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थिनींना वर्गाऐवजी वाचनालयात बसविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Student made to sit in library for not paying fees; Order to investigate school in Dahisar | शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला वाचनालयात बसवलं; दहिसरमधील शाळेच्या चौकशीचे आदेश

शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला वाचनालयात बसवलं; दहिसरमधील शाळेच्या चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दहिसर येथील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थिनींना वर्गाऐवजी वाचनालयात बसविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे विद्यार्थिनीला वेगळी वागणूक देऊन शाळेने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, शाळेने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

२३ जानेवारी रोजी पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे पालक सुधीर कदम यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार पहिल्या सत्राचे १२,५०० रुपयांचे शुल्क भरल्यानंतर दुसऱ्या सत्राचे शुल्क भरण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे आणखी मुदत मागितली होती. मात्र, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी प्राथमिक शाळेने चार विद्यार्थिनींना वर्गात बसू न देता वाचनालयात वेगळे बसवले. या काळात विद्यार्थिनींना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नियमित तासिकांना बसता आले नाही, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, असा आरोप पालकांनी केला आहे.

"शाळेने वर्गाच्या ऐवजी शाळेच्या वाचनालयात मुलींना बसवल्याची तक्रार आहे. त्याबाबतची चौकशी सुरू आहे. संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे अधिक विचारणा करावी", असे दहिसर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाचे शिक्षण निरीक्षक संजय जावी म्हणाले की,"या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांवरील भेदभाव कायद्याने मनाई आहे. संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश उपशिक्षण निरीक्षकांना देण्यात आले आहेत."

"थकीत शुल्कामुळे पालकांना अनेकदा स्मरणपत्र पाठवले. पालकांनी मात्र राजकीय पक्षांद्वारे शुल्कमाफीसाठी दबावतंत्र वापरले", असे दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव आशिष गिरम म्हणाले.

Web Title : फीस न भरने पर छात्रा को पुस्तकालय में बैठाया; दहिसर स्कूल जांच के आदेश

Web Summary : दहिसर के एक स्कूल पर फीस न भरने के कारण छात्राओं को पुस्तकालय में बैठाने का आरोप है, जिससे अभिभावकों में आक्रोश है। स्कूल ने आरोपों का खंडन करते हुए कहा कि अभिभावकों ने फीस माफी के लिए राजनीतिक दबाव डाला।

Web Title : Dahisar School Investigated for Making Student Sit in Library Over Fees

Web Summary : Dahisar school faces inquiry for allegedly making students sit in the library due to unpaid fees, sparking parental outrage and allegations of mental harassment. The school denies the charges, claiming parents used political pressure for fee waivers.