"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 22:12 IST2025-07-13T22:11:38+5:302025-07-13T22:12:39+5:30

Pravin Gaikwad News : अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं

praveen gaikwad sambhaji brigade black ink incidence akkalkot Sanjay Raut gets angry | "भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप

"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये एक गंभीर घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad Sambhaji brigade) यांना आज शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी तोंडाला काळं फासलं आणि त्यांच्या अंगावर शाई ओतण्यात आली. एका शिक्षण संस्थेच्या आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ही घटना घडली. घडलेल्या प्रकारावर खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Sanjay Raut UBT) यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गायकवाड आज अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई ओतली. गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होती. तसेच, स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करुन त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. त्या रागातून हा प्रकार घडला.

"शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे?"

घडलेल्या प्रकारवरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटल्याचे त्यांनी ट्विटे केले. तसेच, राज्यात हे काय चाललंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच! शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे? भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे!" असे मत त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले.

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांना सत्कार समारंभाच्या ठिकाणीच काळे फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान त्यांना गाडीतून बाहेर खेचत धक्काबुक्कीदेखील झाली. त्यांचे कपडेही फाडण्यात आले. यावेळी ते हात जोडून सर्वांची माफी मागताना दिसले. या घटनेनंतर इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अद्याप प्रवीण गायकवाड यांनी या प्रकरणावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: praveen gaikwad sambhaji brigade black ink incidence akkalkot Sanjay Raut gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.