“बेईमानांपेक्षा ते निष्ठावंत शिवसैनिक”; परभणी मुस्लीम महापौरवरून संजय राऊतांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:59 IST2026-02-13T12:57:22+5:302026-02-13T12:59:23+5:30

Parbhani Mayor Election 2026: परभणीत सय्यद इक्बाल महापौर झाल्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धवसेनेवर टीका केली आहे.

parbhani mayor election 2026 sanjay raut said they are more loyal shiv sainiks than dishonest ones | “बेईमानांपेक्षा ते निष्ठावंत शिवसैनिक”; परभणी मुस्लीम महापौरवरून संजय राऊतांचा रोख कुणाकडे?

“बेईमानांपेक्षा ते निष्ठावंत शिवसैनिक”; परभणी मुस्लीम महापौरवरून संजय राऊतांचा रोख कुणाकडे?

Parbhani Mayor Election 2026: परभणी महानगरपालिकेत काँग्रेसने उद्धवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धवसेनेचे सय्यद इक्बाल महापौर झाले. तर, काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर झाले. परभणीत सय्यद इक्बाल महापौर झाल्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धवसेनेवर टीका केली आहे. या टीकेला संजय राऊत यांनी थेट उत्तर दिले. 

एकनाथ शिंदे अक्षरशत्रू आहेत. अक्षरशत्रू या शब्दाचा अर्थ समजून घ्यावे. भारतीय जनता पक्षाला परभणीत महापौर करण्याची संधी मिळाली असती ना, तर त्या १२ मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक महापौर झाला असता, हे लक्षात ठेवा. या देशामध्ये हिंदू-मुसलमान असे करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान होते, मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होते, उत्तर प्रदेश किंवा बिहारचे राज्यपाल मुस्लिम होते, या देशाचे राष्ट्रपती मुस्लिम झालेले आहेत. डॉ. अब्दुल कलाम हेही मुस्लिम होते ना, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

बेईमानांपेक्षा ते निष्ठावंत शिवसैनिक

तुम्ही काय मुसलमानांना तिकिटे दिली नाहीत का ? दिली ना. भाजपाने तिकिटे दिली नाही का? दिली ना सर्वत्र. तुमच्यासारख्या बेईमानांपेक्षा हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. परभणीचे जे महापौर झालेत ते तालुकाप्रमुख आहेत. अनेक वर्ष तो माणूस पक्षाचे काम करत आहे. पक्षासाठी झिजतोय, पक्षाबरोबर राहिलेल्या अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केले तर यांच्या पोटात दुखणारच, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

दरम्यान, त्या एकनाथ शिंदेंना सांगा जरा अभ्यास करा. डोक्याला तेल वगैरे लावा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे १२ नगरसेवक हे मुसलमान आहेत, हे त्यांना माहीत आहे का? परभणीमध्ये भाजपाचे १२ नगरसेवक मुस्लिम आहेत. इतर ठिकाणी असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत.  या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत. ते काय घुसखोर नाहीत ना? आमचे पदाधिकारी आहेत, वर्षानुवर्ष काम करणारे ते. मग मुसलमान म्हणून कायकर्त्यांना काय दूर ठेवणार का?, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. 

 

Web Title : राउत ने परभणी के मुस्लिम महापौर का बचाव किया, आलोचकों को लताड़ा।

Web Summary : संजय राउत ने परभणी के मुस्लिम शिवसेना सदस्य के महापौर के रूप में चुनाव का बचाव किया, भाजपा और शिंदे गुट की पाखंड के लिए आलोचना की। उन्होंने मुस्लिम उम्मीदवारों के उनके अपने उपयोग पर प्रकाश डाला और महापौर की शिवसेना के प्रति निष्ठा पर जोर दिया।

Web Title : Raut defends Parbhani Muslim Mayor, slams critics' hypocrisy.

Web Summary : Sanjay Raut defends the election of a Muslim Shiv Sena member as Parbhani's mayor, criticizing BJP and Shinde faction for hypocrisy. He highlights their own use of Muslim candidates and emphasizes the mayor's loyalty to Shiv Sena.