ईव्हीएमवर बोलायला आधार नाही, पण शंका; शरद पवार आज मारकडवाडीला जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 06:06 IST2024-12-08T06:05:39+5:302024-12-08T06:06:01+5:30

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत एकतर्फी लागलेल्या निकालावर शनिवारी बोट ठेवले.

No basis to talk about EVMs, but doubts; Sharad Pawar will go to Markadwadi today  | ईव्हीएमवर बोलायला आधार नाही, पण शंका; शरद पवार आज मारकडवाडीला जाणार 

ईव्हीएमवर बोलायला आधार नाही, पण शंका; शरद पवार आज मारकडवाडीला जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० लाख मते मिळाली असून, त्यांचे १५ उमेदवार विजयी झाले, शिंदेसेनेला ७९ लाख मते मिळून त्यांचे ५७ लोक निवडून आले. ईव्हीएमवर शंका घ्यायला कोणताही अधिकृत आधार नसला तरी मतांची ही आकडेवारी आश्चर्यकारक आहे, या शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत एकतर्फी लागलेल्या निकालावर शनिवारी बोट ठेवले. लोकांची मते जाणून घेण्यासाठी रविवारी मारकडवाडीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले, पुढील सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र सामोरे जाणार आहोत. पराभवाने कधी नाउमेद व्हायचे नाही. यावेळी राज्यात आमचा पराभव झाला.पण लोकांमध्ये उत्साह नाही.

जुन्या पद्धतीने मतदान घ्यायला बंदी का ?
nमारकडवाडी गावाने जुन्या पद्धतीने मतदान घेण्याची भूमिका घेतली; पण प्रशासनाने त्याला बंदी घातली. त्यांना बंदी करायचे कारण काय, हा कोणता कायदा आहे, असा सवाल पवार यांनी केला. मारकडवाडीत १४४ कलम लावले, मला याचे आश्चर्य वाटले.

nत्यामुळे मारकडवाडीत जाऊन लोकांकडूनच समजून घेऊ, अधिकारी असतील तर त्यांचेही मत घेऊ यासाठीच मी रविवारी मारकडवाडीला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: No basis to talk about EVMs, but doubts; Sharad Pawar will go to Markadwadi today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.