“राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 12:13 IST2023-07-01T12:12:44+5:302023-07-01T12:13:33+5:30

Sharad Pawar On Buldhana Bus Accident: आठवड्यापूर्वीच आकडेवारी मागवून अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

ncp chief sharad pawar reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana | “राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान

“राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान

Sharad Pawar On Buldhana Bus Accident:समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर आता मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. नेतेमंडळी घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थिती आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.

शरद पवार यांनी एक ट्विट करत या दुर्दैवी अपघातातबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते

या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, अशी माहिती शरद पवार यांनी ट्विटमधून दिली आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे,  या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: ncp chief sharad pawar reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana