राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:19 IST2026-01-14T12:18:00+5:302026-01-14T12:19:22+5:30

Municipal Election 2026 data : शहरीकरण आणि नवीन गृहप्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे-पिंपरी परिसरातील मतदार नोंदणीने नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः तरुण मतदारांची वाढलेली संख्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

Municipal Election 2026 data: Explosion of new voters in 'this' city of the Maharashtra! Huge increase in the number of voters by 44 percent Pimpri Chinchwad, who will be affected? | राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 

राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी २९ महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. शहरीकरण आणि नवीन गृहप्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे-पिंपरी परिसरातील मतदार नोंदणीने नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः तरुण मतदारांची वाढलेली संख्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

राज्यातील २९ महापालिकांचा विचार करता पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ (४४%) नोंदवली गेली आहे. येथे मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ५,२१,८०२ नवीन मतदारांची भर पडली आहे. आयटी हब आणि औद्योगिक विकासामुळे येथे स्थलांतरितांची संख्या वाढल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वाढीव मतदारांचा कोणाला 'धसका'
अनेक शहरांमध्ये ५० हजार ते ५ लाखांपर्यंत मतदार वाढल्याने प्रभाग रचनेचे गणित पूर्णपणे बदलले आहे. नवीन मतदारांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार आता महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये वाढलेले मतदार कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, यावर सत्ता कुणाची येणार हे अवलंबून असेल. पिंपरी चिंचवडमध्ये स्थलांतरीत झालेला तरुण वर्ग कोणाच्या बाजुने मतदान करतो, यावर अजित पवार राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेनेचे भविष्य ठरणार आहे. 

मतदान केंद्रांवर वाढणार ताण?
मतदार वाढल्यामुळे निवडणूक आयोगाला संवेदनशील केंद्रांची संख्याही वाढवावी लागली आहे. उदा. ठाण्यात १७६ तर पुण्यात ९०६ संवेदनशील केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी जास्तीत जास्त कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

प्रमुख शहरांमधील मतदार वाढीचा आलेख
खालील तक्त्यावरून लक्षात येईल की कोणत्या शहरात किती नवीन मतदार वाढले आहेत:

अ.क्र.महानगरपालिकाप्रभागएकूण सदस्यउमेदवारएकूण मतदारमतदार वाढमागील मतदान (%)
बृहन्मुंबई (BMC)२२७२२७१७००१,०३,४४,३१५११,६३,६६१५८.०८%
पुणे (PMC)१६५१६५१९५५३५,५१,८५४३,२१,३५४५३.५०%
नागपूर (NMC)३८१५१९९३२४,८३,११२३,८९,७२०५३.७३%
पिंपरी-चिंचवड३२१२८६९२१७,१३,८९१५,२१,८०२४४.१%
ठाणे (TMC)३३१३१६४९१६,४९,८६८४,२१,२६२५८.०८%
नाशिक३११२२७३५१३,६०,७२२३,०७,०००६१%
कल्याण-डोंबिवली३११२२४८८१४,२४,५२०१,७३,८७४४५.६१%
वसई-विरार२९११५-११,२७,६३७-४९%
छत्रपती संभाजीनगर२९११७१२६७११,१८,१९८८,१२,०००६३%
१०नवी मुंबई२८१११५००९,४८,४६०--
११सोलापूर२६१०२५६४९,२४,७०६२,५०,७६४५९.५६%
१२मिरा-भाईदर२४९५-८,१९,१५३--
१३भिवंडी-निजामपूर२३९०४३८६,६९,०३३१,८९,७८०५१%
१४अमरावती२२८७६६१६,७७,१८०१,६४,६४८-
१५मालेगाव२१८४३०१५,१७,६६३१,२६,३४३-
१६कोल्हापूर२०८१३२७४,९४,७११-६८.८५%
१७उल्हासनगर२०७८५९६४,३९,९१२३५,१९३४६.४०%
१८सांगली-मिरज-कुपवाड२०७८३८१४,३०,२४०-६२.१७%
१९अकोला२०८०६३०५,५०,०६०७२,६८८५५.९२%
२०नांदेड२०८१४९१५,०१,७९९१,०४,९२७६५%
२१पनवेल२०७८२४६१२,२९,१२५-५९.७२%
२२धुळे१९७४३१६५,०६,१८०--
२३जळगाव१९७५३२१७,३०,३८७१०,०००-
२४लातूर१८७०३५९३,७५,०९९९९,०००-
२५अहिल्यानगर१७६७२८३४,३८,५२३-६८%
२६इचलकरंजी१६६५३०२२,४८,२०७२९,०४१७६.५०%
२७जालना१६६५२०१२,४४,१०२३३,१७४५३.२५%
२८परभणी१६६५४११२,६१,२००४८,३५१६३%
२९चंद्रपूर१५६६-२,९९,९९४-५२.५६%

Web Title : पिंपरी-चिंचवड में मतदाताओं की भारी वृद्धि; किसे होगा असर?

Web Summary : महाराष्ट्र के नगर निगम चुनावों में मतदाताओं की संख्या बढ़ी, खासकर पिंपरी-चिंचवड (44%) में। शहरीकरण और युवा मतदाताओं के कारण यह वृद्धि चुनावी समीकरणों को बदल देगी। संवेदनशील मतदान केंद्र भी बढ़ेंगे।

Web Title : Pimpri-Chinchwad sees massive voter surge; who will it impact?

Web Summary : Maharashtra's municipal elections see voter increases, especially in Pimpri-Chinchwad (44%). This surge, driven by urbanization and young voters, significantly alters electoral dynamics. Increased sensitive polling locations and staffing are needed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.