मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:31 IST2025-12-30T14:29:57+5:302025-12-30T14:31:01+5:30
Jalana Municipal Corporation Election 2026 : आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) यांच्यात अनेक महापालिकांमध्ये युती करण्यावर एकमत झाले नाही. यामुळेच मराठवाड्यात महायुतीला तडा गेल्याचे पाहायला मिळतेय. छत्रपती संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणी महापालिकेत दोन्ही पक्षांनी स्वबळाची घोषणा केली आहे. तर, परभणीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत.
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काल(दि.29) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. माजी उप महापौरी राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाटांच्या घराबाहेर ठिय्या दिला. अखेर, शिरसाटांनी भाजपवर टीका करत युती तुटल्याची घोषणा केली. त्यानंतर, आता आज जालना, नांदेड अन् परभणी महापालिकेतही शिवसेने एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीही स्वतंत्र लढणार
दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून महायुतीत अपेक्षित जागा मिळत नसल्याने अनेक ठिकाणी स्थानिक नेते/पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच, अजित पवार गटानेही छत्रपती संभाजीनगरसह, जालना, नांदेड अन् परभणीत महायुतीतून न लढण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, परभणीत दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार-अजित पवार) एकत्र निवडणूक लढणार आहेत.
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत