Mahrashtra Election 2019 : Video : उदयनराजेंचा शरद पवारांवर पलटवार, साताऱ्यातील सभेला 'ही' उपमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 05:21 PM2019-10-19T17:21:07+5:302019-10-19T17:22:30+5:30

Mahrashtra Election 2019 : Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालेले दिसत आहेत

Mahrashtra Election 2019 : Video : Uttarayan Raje's bhosale critics on sharad pawar on satara rally of election | Mahrashtra Election 2019 : Video : उदयनराजेंचा शरद पवारांवर पलटवार, साताऱ्यातील सभेला 'ही' उपमा

Mahrashtra Election 2019 : Video : उदयनराजेंचा शरद पवारांवर पलटवार, साताऱ्यातील सभेला 'ही' उपमा

Next

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची साताऱ्यात मुसळधार पावसातील सभा देशभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालंय. आता, उदयनराजे भोसलेंनी पवाराच्या या सभेचा आपल्या शब्दात समाचार घेतलाय.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालेले दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यातील खासदारकीच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार चित्र बदलल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यानंतर, आज साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले. तसेच, पवारांच्या पावसातील सभेला काळू-बाळूचा तमाशा असे म्हटलंय. 

साताऱ्यातील सभेत पडलेला पाऊस हा शुभ शकून नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घाण धुवून टाकण्याची सुरूवात झाल्याचे संकेत असल्याचे उदयनराजेंनी म्हटलंय. साताऱ्यातील सभा म्हणजे जनतेला काळू-बाळूचा तमाशा वाटला. या तमाशाला, ढगाला लागली कळ, काँग्रेस राष्ट्रवादीची मत गळ आणि धनुष्यबाण-कमळाची मतं फुलं, असंच म्हणाव लागेल, उदयनराजेंनी कागदावर भाषण लिहून आणलं होतं, ते भाषण वाचून दाखवताना पवारांना ती माझी चूक होती का? असे अनेक प्रतिप्रश्न पवारांना केले आहेत.
दरम्यान, पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती, ती चूक दूरुस्त करण्याची वेळ आली असून घराघरातील तरुण वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. 

Web Title: Mahrashtra Election 2019 : Video : Uttarayan Raje's bhosale critics on sharad pawar on satara rally of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.