Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:45 IST2024-11-27T12:44:23+5:302024-11-27T12:45:30+5:30
Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता नव्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांना की एकनाथ शिंदे यांना मिळणार यावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, भाजपाच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बिहार फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे संकेत दिले आहेत.
काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंस कायम आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. महाराष्ट्रात शिवसेनेकडून अशी कोणतीही बांधिलकी करण्यात आली नाही. आम्ही बिहारमध्ये जनता दल सोबत युती केली जेणेकरून भाजप राज्यात प्रवेश करू शकेल, जे झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही हे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
प्रेम शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले की, बिहारमध्ये लागू केलेले मॉडेल महाराष्ट्रासाठी योग्य नाही. महाराष्ट्रात अशी बांधिलकी असण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडे मजबूत संघटनात्मक पाया आणि नेतृत्व आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. याउलट, मुख्यमंत्र्यांचा निर्णय निवडणुकीच्या निकालांवर आधारित असेल, असे सर्वोच्च नेतृत्वाने निवडणुकीदरम्यान सांगितले होते.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांचा दावा फेटाळून लावला.
दानवे म्हणाले, मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी आधीच त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती केली आहे आणि भाजप लवकरच नेता निवडणार आहे.