Maharashtra Election Voting Live :हे काका हॉस्पिटलमधून मतदानाला आले, आपण घरून जाऊच शकतो ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 03:06 PM2019-04-11T15:06:40+5:302019-04-11T15:08:10+5:30

देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकीच्या मतदानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं

Maharashtra Lok Sabha Election 2019 Live: Hospital patient did voting in elections | Maharashtra Election Voting Live :हे काका हॉस्पिटलमधून मतदानाला आले, आपण घरून जाऊच शकतो ना?

Maharashtra Election Voting Live :हे काका हॉस्पिटलमधून मतदानाला आले, आपण घरून जाऊच शकतो ना?

googlenewsNext

नागपूर - देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकीच्या मतदानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगाकडून जगजागृती मोहीम आखली जाते. विदर्भात आज पहिल्या टप्प्यात मतदान होत असून या मतदानासाठी सामान्य माणूस मोठ्य़ा प्रमाणात सकाळपासून बाहेर पडताना दिसतोय. 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडतंय, सकाळपासून या नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यामध्ये नागरिकांना मतदानासाठी रांगा लावलेल्या दिसत आहे. मात्र एका काका चक्क मतदान करण्यासाठी रुग्णालयाच्या बेडसह मतदान केंद्रावर पोहचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे निश्चित या काकांचा उत्साह पाहून इतर मतदारांनीही जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडावं. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही नागभीड तालुक्यातील कालीराम मारबते यांचे आज लग्न आहे. गिरगाव येथे ते लग्नासाठी सकाळी निघाले. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी मतदान करुन आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आहे. 

वयोवृद्ध दामप्त्य, तरूण मंडळी, महिला यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या लोकशाहीला बळकट करायचे आहे. जर हे काका हॉस्पिटलमधून थेट निवडणूक केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावत असतील तर तुम्ही सुद्धा न चुकता मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन लोकमतकडून ही नागरिकांना करण्यात येत आहे.  

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी देशभरात मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशात पहिल्या टप्प्यात 18 राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. राज्यातही विदर्भातील 10 मतदारसंघातील 7 मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. नागपूर , रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 116 उमेदवार रिंगणात आहेत. 1 कोटी 30 लाख मतदार आहेत. 

दिग्गज नेते नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये आदींचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी शिवसेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारली असून त्यांच्याऐवजी नाना पंचबुद्धे यांना रिंगणात उतरवले आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी 
वर्धा - 30.22 टक्के
रामटेक - 23.19 टक्के
नागपूर - 27.47 टक्के
भंडारा-गोंदिया - 32.02 टक्के
गडचिरोली-चिमूर - 41.87 टक्के
चंद्रपूर - 30.50 टक्के 
यवतमाळ - 26.09 टक्के 

 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2019 Live: Hospital patient did voting in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.