अजून एक अपक्ष आमदार शिवसेनेच्या गोटात, मंजुळा गावित यांनी दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 17:19 IST2019-10-30T17:19:41+5:302019-10-30T17:19:49+5:30
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थानांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

अजून एक अपक्ष आमदार शिवसेनेच्या गोटात, मंजुळा गावित यांनी दिला पाठिंबा
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थानांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये आपले वजन वाढावे यासाठी दोन्ही पक्षांकडून आपापले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना आपापल्या गोटात खेचले जात आहे. आता शिवसेनेला अजून एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे. साक्री येथील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष मंजुळा गावित विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपाचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केला होता. दरम्यान, आज मंजुळा गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 62 वर पोहोचले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातील आमदार शंकरराव गडाख यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता.