मी दोघांचाही प्रवक्ता नाही :  देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:26 AM2024-03-24T09:26:32+5:302024-03-24T09:26:55+5:30

मनसेला महायुतीत सामावून घेण्यासंदर्भात गेली काही दिवस चर्चा सुरू आहे.

I am not a spokesperson for either: Devendra Fadnavis | मी दोघांचाही प्रवक्ता नाही :  देवेंद्र फडणवीस

मी दोघांचाही प्रवक्ता नाही :  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मी शिवसेना किंवा मनसेचाही प्रवक्ता नाही. त्यामुळे मी या विषयावर उत्तर देऊ शकणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन पक्षांचे विलीनीकरण होणार का, या पत्रकारांच्या प्रश्नात दिली. 

मनसेला महायुतीत सामावून घेण्यासंदर्भात गेली काही दिवस चर्चा सुरू आहे. मात्र, त्यात दोन पक्षांच्या विलीनीकरणाच्या पर्यायाचीही चर्चा सध्या आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी कायम राहावे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेचे प्रमुखपद स्वीकारावे, असे बाेलले जात आहे. 
फडणवीस यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की,  असा कुणाचा पक्ष कुणाकडे जात नसतो.  मात्र, एक नक्की की मनसेला महायुतीत सामावून घेण्यासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे. 

Web Title: I am not a spokesperson for either: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.