महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 06:13 IST2026-01-09T06:13:29+5:302026-01-09T06:13:29+5:30
Holiday on January 15, 2026: मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व महापालिका क्षेत्रात त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. महापालिका क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.