आपल्या आयुष्यातील 'वेदनाहर्त्या'चे मानूया आभार! Iodex व लोकमत प्रस्तुत "वेदनाहर्ता" अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:46 IST2025-08-30T12:44:52+5:302025-08-30T12:46:53+5:30
गणराय हा विघ्नहर्ता आहे. सोबतच आपल्या आजूबाजूला असे अनेक "वेदनाहर्ते" आहेत, जे आपली काळजी घेतात, आपल्याला बळ देतात. या कॅम्पेनमधून आपण त्यांना मानाचा मुजरा करणार आहोत.

आपल्या आयुष्यातील 'वेदनाहर्त्या'चे मानूया आभार! Iodex व लोकमत प्रस्तुत "वेदनाहर्ता" अभियान
गणेशोत्सव म्हटलं की श्रद्धाळूंची गर्दी, भव्य मंडप, रोषणाई आणि बाप्पाच्या दर्शनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा! अशा वेळी अनेक भाविक तासन्तास उभे राहून दर्शन घेतात. या प्रतीक्षेमुळे पाय, पाठ, मान व खांद्याला होणाऱ्या वेदना स्वाभाविक आहेत. याच वेदना कमी करण्यासाठी Iodex व लोकमत यांनी महाराष्ट्रातील ४ प्रमुख शहरांत (पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई) खास उपक्रम राबवला आहे.
Iodex बुथवर विशेष सोय
>> दर्शनानंतर भाविकांना फ्री फिजिओ कन्सल्टेशन मिळेल. तज्ज्ञ डॉक्टर व फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करून थकवा व वेदना कमी करण्याचे सोपे उपाय सांगतील.
>> बुथमध्ये ठेवलेल्या "विश वॉल" वर भाविक आपला संदेश लिहू शकतात – "माझा वेदनाहर्ता कोण?" आई-वडील, मित्र, शिक्षक किंवा कुणी खास व्यक्ती – ज्यांनी आपल्या आयुष्यातील वेदना, अडचणी दूर केल्या, त्यांना हे शब्दांचं अर्पण.
का आहे हा उपक्रम खास?
गणराय हा विघ्नहर्ता आहे. सोबतच आपल्या आजूबाजूला असे अनेक "वेदनाहर्ते" आहेत, जे आपली काळजी घेतात, आपल्याला बळ देतात. या कॅम्पेनमधून आपण त्यांना मानाचा मुजरा करणार आहोत. Iodex – प्रत्येक वेदनेचा विघ्नहर्ता. 'लोकमत'च्या सहकार्याने हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
बाप्पा विघ्नहर्ता आहेच, पण हे हातही आहेत!
गणेशोत्सव आला की प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक उजळून निघतो. सजावट, आरास, रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, आरत्या – सगळं काही आनंदमयी होतं. आपण घराघरांतून बाप्पाचं स्वागत करतो. पण या भव्य सोहळ्यामागे काही असे 'योद्धे' असतात, ज्यांचं योगदान कधी आपल्या नजरेत येत नाही.
मूर्तिकार – जे चिखल, माती, प्लॅस्टरमध्ये दिवस-रात्र झटत राहतात. त्यांच्या बोटांवर फोड येतात, अंग दुखतं. पण, त्या वेदना सहन करत ते बाप्पाची दिव्य मूर्ती साकारतात.
मंडप सजावट करणारे कलाकार – जे उंच शिड्या चढून, दिवसरात्र कागद, थर्माकोल, लाकूड यांची सांगड घालून स्वर्गीय दरबार उभा करतात. त्यांच्या पाठीला, खांद्याला होणारा ताण ते शांतपणे सहन करतात.
वाहतूक पोलीस व पोलीस कर्मचारी – जे स्वतःच्या घरच्या बाप्पाची आरती न करता, रस्त्यावर तासन्तास उभे राहून लोकांची सुरक्षितता, शिस्त आणि सोय सांभाळतात. ऊन, पाऊस, गर्दी – सगळं सहन करून ते कर्तव्य निभावतात.
आणखी बरेच – ढोल-ताशावाले, लाईटिंग करणारे कामगार, मंडपात खुर्च्या, पंखे लावणारे, विसर्जनाच्या दिवशी व्यवस्था करणारे स्वयंसेवक – हे सारे हात न थकता काम करत राहतात.
या सर्वांच्या अंगावरचं ओझं म्हणजे वेदना – पाठ, मान, खांदे, पाय. वेदना जी त्यांना जाणवते, पण आपण कधी जाणत नाही.
याच अदृश्य विघ्नहर्त्यांना या गणेशोत्सवात आपण सलाम करूया. त्यांच्या सोबत राहण्यासाठी आहे Iodex – प्रत्येक वेदनेचा विघ्नहर्ता. कारण जशी बाप्पा आपल्या जीवनातील संकटं दूर करतात, तशीच Iodex त्यांच्या वेदना कमी करत त्यांना पुन्हा उभं राहायला बळ देतो. यावर्षी बाप्पाच्या दर्शनासोबतच आपल्या आयुष्यातील खऱ्या वेदनहर्त्यांना आठवा, त्यांचे आभार माना – आणि Iodex सोबत वेदनारहित उत्सव साजरा करा. कारण उत्सव फक्त आपण साजरा करत नाही – तो ते घडवतात.
Iodex – प्रत्येक वेदनेचा विघ्नहर्ता.
आयोडेक्स विश वॉल वरून काही संदेश:
"आई, तू माझी खरी वेदनाहर्ता आहेस. तुझ्याशिवाय काहीच शक्य नाही."
"बाबा, तुझं 'काळजी करू नकोस' हेच माझं औषध. तूच Vednaharta."
"पोलीस काका, तुम्ही रोज उन्हात उभं राहता. आमच्यासाठी तुम्हीच Vednaharta."
"माझा मित्र, जो प्रत्येक संकटात माझ्या सोबत उभा राहिला – तोच माझा वेदनहर्ता."
"माझा बाप्पा – जो नेहमी विघ्नहर्ता आहे, आणि माझ्या वेदनांनाही हरतो!"