नांदेडमध्ये ७५ केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची पडताळणी; काय सापडले पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:35 IST2024-12-09T06:35:12+5:302024-12-09T06:35:32+5:30

वेगवेगळ्या राज्यांतून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात. त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते.

EVM, VVPAT not a single vote difference; Verification at 75 centers in Nanded  | नांदेडमध्ये ७५ केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची पडताळणी; काय सापडले पहा...

नांदेडमध्ये ७५ केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची पडताळणी; काय सापडले पहा...

लोकमत न्यूज नेटवर्क 
नांदेड : देशात आणि राज्यात ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्रांच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय मतांची व्हीव्हीपॅटशी जुळवणी होते काय? याची तपासणी केली असता लोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या ४५ अशा एकूण ७५ मतदान केंद्रांवरील मतमोजणी बिनचूक निघाली असून त्यात एकाही मताचा फरक नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

वेगवेगळ्या राज्यांतून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात. त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते.

कशी झाली निवड आणि मोजणी? 
जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी ५ प्रमाणे ४५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून सर्व ४५ ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील ६ विधानसभा क्षेत्रांतील प्रत्येकी ५ प्रमाणे ३० मतदान केंद्रांवरही एकाही मताचा फरक आढळला नाही. या ५ केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठी काढून झाली.

Web Title: EVM, VVPAT not a single vote difference; Verification at 75 centers in Nanded 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.