चंद्रपुरात वऱ्हाड घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटला, ४ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 16:27 IST2021-02-25T16:26:42+5:302021-02-25T16:27:03+5:30
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला आहे.

चंद्रपुरात वऱ्हाड घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटला, ४ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला आहे. या अपघतात ४ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये वाहन चालकासह २ पुरुष आणि २ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. तर सुमारे २० वऱ्हाडी अपघातात जखमी झाले आहेत.
रत्नापूर येथून विवाह आटोपून एकारा येथे वऱ्हाडी जात असताना अपघात घडला आहे. स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात केले दाखल केले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे साहिल कोराम (१४), रघुनाथ कोराम (४१), कविता संजय बोरकर (३५), वीणा घनश्याम गहाणे (२६) आणि वैभव लोमेश सहारे (३०)